IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमान नगर पोलिस स्टेशन – मुली बरोबर बोलू नको सांगितल्याने दुचाक्या दिल्या पेटवून

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Viman Nagar Police Station - Girls were given bikes and set on fire after being told not to talk to them

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | मुलीबरोबर बोलायचे नाही, तिला त्रास देऊ नको, असे सांगितल्याने मुलाने ती रहात असलेल्या ठिकाणी पार्किंगमध्ये लावलेली दुचाकीसह तीन दुचाकी पेटवून दिल्या.

 

याप्रकरणी लोहगावमधील एका युवतीच्या वडिलांनी विमान नगर पोलीस स्टेशनमध्ये (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीराम घाडगे (रा. वाघोली) व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खांदवेनगर येथे सोमवारी मध्यरात्री दीड वाजता घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी व आरोपी श्रीराम घाडगे हे एका कॉलेजमध्ये शिकतात. श्रीराम याने तिला माझ्यासोबर बोलत जा असे म्हणून त्रास देत होता. तिने हे आपल्या वडिलांना सांगितले. तेव्हा त्यांनी आरोपी श्रीराम याला तिला  तुझ्यासोबत बोलायचे नाही. उगाच त्रास देऊ नको, असे सांगितले. त्याचा राग मनात धरुन त्याने एका साथीदाराला बरोबर घेतले.
मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी यांचे पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीला आग लावली. त्यात त्यांच्या शेजारी असलेल्या आणखी दोन दुचाकींनाही आग लागून त्यांचे नुकसान झाले. पोलीस हवालदार धेंडे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News : Viman Nagar Police Station – Girls were given bikes and set on fire after being told not to talk to them

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – ज्येष्ठ कचरावेचक महिलेच्या अंगावर कुत्रा सोडून केली मारहाण; पैसे न देता कचरा उचलण्याची केली सक्ती

Shambhuraj Desai | संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर शंभूराज देसाईंचं प्रत्त्युत्तर, म्हणाले-‘स्वत:चं ठेवायचं झाकून आणि…’

Pune PMC Water Supply Dept News | पुणे महानगरपालिका : शहरात लवकरच आठवड्यातून एक दिवस पाणी कपात ! अल निनोच्या पार्श्‍वभूमीवर मनपाची तयारी सुरू

Nana Patole | अजित पवार मुख्यमंत्री होणार? नाना पटोले म्हणाले – ‘मोदी है तो मुमकिन है’

 

Related Posts