IMPIMP

Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांकडून तृष्णा शांतीसाठी जिल्हयात 30 ठिकाणी पाणीपोईची सोय ! पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद

by nagesh
Nandurbar Police News | Nandurbar police provide pure and cold water facility at 30 places in the district for Trishna Shanti! Superintendent of Police P.R. Patil's concept

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाईन – वाढत्या उन्हाची तीव्रता आणि वाढते तापमान लक्षात घेवुन नंदुरबार पोलिस दलाकडून (Nandurbar Police News) जिल्हयात तब्बल 30 ठिकाणी शुध्द पाण्याचे जार असलेल्या पाणीपोईंची सोय करण्यात आली आहे (Provision of drinking water for thirsty citizens by Nandurbar Police) . नंदुरबार पोलिसांकडून 30 ठिकाणी शुध्द व थंडगार पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. आणखी काही ठिकाणी पाणीपाई सुरू करण्यात येणार आहेत. जारचे शुध्द व गार पाणी देण्याचा नंदुरबार पोलिसांचा (Nandurbar Police News) प्रयत्न असून त्यासाठी कर्मचार्‍यांची नेमण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P. R. Patil) यांनी दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंन्थली क्राईम मिटींगमध्ये (Police Monthly Crime Meeting) पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी पाणीपोईची संकल्पना मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेस नंदुरबार पोलिस दलातील (Nandurbar Police News) सर्वच पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लिा असून सध्या 30 ठिकाणी पाणीपोईची सोय करण्यात आली आहे. जिल्हयात एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाची तीव्रता खुप असते. तापमानाचा पारा 40 ते 44 डिग्री सेल्सीअसपर्यंत जातो. उन्हाळयात लग्नसराई व धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे हजारो लोक प्रवास करीत असतात. त्यांचा स्वच्छ, शुध्द व थंडगार पाणी मिळावे आणि तहानलेल्यांची तहान भागविण्यासाठी 30 ठिकाणी पाणीपाईची सोय करण्यात आली आहे.

 

नंदुरबार शहर पोलिस स्टेशनच्या (Nandurbar City Police Station) हद्दीत स्टेट बँक कॉलनी आणि पोलिस स्टेशनसमोर तर नंदुरबार तालुका पोलिस स्टेशनच्या (Nandurbar Taluka Police Station) हद्दीत रनाळा, आष्टा व कोरीट नाका येथे पाणीपोईची सोय करण्यात आली आहे. उपनगर पोलिस स्टेशनच्या (Upanagar Police Station Nandurbar) हद्दीत काकाचा ढाबाजवळ, धानोरा गावात तर नवापूर पोलिस स्टेशनच्या (Navapur Police Station) हद्दीत पोलिस ठाण्यासमोर, अग्रवाल भवन व सामान्य रूग्णालय येथे व्यवस्था
करण्यात आली आहे. विसरवाडी पोलिस स्टेशनच्या (Visarwadi Police Station) हद्दीत जामा मशिदीजवळ, स्टेट बँक येथे तर शहादा पोलिस स्टेशनच्या (Shahada Police Station) हद्दीत पोलिस ठाण्यासमोर, बसस्थानक व जनता चौक येथे पाणीपोई सुरू करण्यात आली आहे.

 

सारंगखेडा पोलिस स्टेशनच्या (Sarangkheda police Station) हद्दीत सारंगखेडा व वडाळी गावात तर धडगाव पोलिस स्टेशनच्या (Dhadgoan Police Station) हद्दीत पो. ठाण्यासमोर आणि धडगाव गावात पोणीपाई उभारण्यात आली आहे. म्हसावद पोलिस स्टेशनच्या (Mhasawad Police Station Nandurbar) हद्दीत पोलिस ठाण्याच्या समोर, कोचरा माता मंदिर आणि साई हॉस्पीटलजवळ पाणीपोई सुरू करण्यात आली आहे. अक्कलकुवा पोलिस स्टेशनच्या (Akkalakuwa Police Station) हद्दीत पोलिस ठाण्याच्या समोर व खापर दूरक्षेत्र येथे तर तळोदा पोलिस स्टेशनच्या (Taloda Police Station) हद्दीत तहसील कार्यालयाजवळ, आंबीगव्हाण फाटा
व बोरद येथे सोय करण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मोलगी पोलिस स्टेशनच्या (Molgi Police Station) हद्दीत पोलिस ठाण्यासमोर व बैल बाजार येथे तसेच शरद वाहतूक शाखेसमोर (Nandurbar Traffic Police) पाणीपाईची सोय करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेतुन उभारण्यात आलेल्या 30 पाणीपाईंच्या माध्यमातून हजारो तहानलेल्या नागरिकांनी तहान भागणार आहे.

 

 

Web Title :- Nandurbar Police News | Nandurbar police provide pure and cold water facility at 30 places in the district for Trishna Shanti! Superintendent of Police P.R. Patil’s concept

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमान नगर पोलिस स्टेशन – मुली बरोबर बोलू नको सांगितल्याने दुचाक्या दिल्या पेटवून

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – ज्येष्ठ कचरावेचक महिलेच्या अंगावर कुत्रा सोडून केली मारहाण; पैसे न देता कचरा उचलण्याची केली सक्ती

Shambhuraj Desai | संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर शंभूराज देसाईंचं प्रत्त्युत्तर, म्हणाले-‘स्वत:चं ठेवायचं झाकून आणि…’

 

Related Posts