IMPIMP

Pune Crime News | पीएमपीएमएल बसमध्ये चोरी करणार्‍या सराईताला अटक, मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | पीएमपीएमएल बसमध्ये चोरी करणार्‍या सराईताला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट-2 ने अटक केली आहे. त्याच्याकडून वाहन चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विक्रम बाबुराव गायकवाड (36, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 1 होंडा युनिकॉन मोटारसायकल व 1 वन प्लस मोबाईल असा एकुण 45 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मोटारसायकलबद्दल लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (PI Krantikumar Patil), पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble) आणि त्यांचे पथक युनिट-2 च्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार कादिर शेख आणि समीर पटेल यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून त्यांनी सापळा रचुन आरोपीला अटक केली. आरोपी विक्रम गायकवाड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

 

अति वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलिस अंमलदार शंकर नेवसे,
राहुल राजपुरे, कादिर शेख, समीर पटेल, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, गजानन सोनुने आणि
नागनाथ राख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | चंदननगर परिसरातील जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या ‘सासु’चा छापा

Swapnil Joshi | स्वप्निल जोशीच्या ‘त्या’ ट्वीटवर रितेश आणि जिनिलीयाने दिला मराठीत रिप्लाय; म्हणाले – ‘तुमच्या शुभेच्छांसाठी…’

Maharashtra Politics | ‘मागची २५ वर्षे ज्यांनी मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं तेच आज…; शिंदे गटाची ठाकरे गटावर सडकून टीका

 

Related Posts