IMPIMP

Swapnil Joshi | स्वप्निल जोशीच्या ‘त्या’ ट्वीटवर रितेश आणि जिनिलीयाने दिला मराठीत रिप्लाय; म्हणाले – ‘तुमच्या शुभेच्छांसाठी…’

by nagesh
Swapnil Joshi | marathi actor swapnil joshi tweet for ved movie riteish and genelia reply in marathi

सरकारसत्ता ऑनलाईन  – Swapnil Joshi | सध्या अभिनेता रितेश देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. वेड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. वेड (Ved Movie) या चित्रपटासोबतच बॉक्स ऑफिसवर ‘वाळवी’ या चित्रपट देखील चांगलाच गल्ला जमवताना दिसत आहे. आता स्वप्निल जोशी यांनी वेड चित्रपटाबाबत केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे. (Swapnil Joshi)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वेड चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता रितेश देशमुख यांनी चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. तर पत्नी जेनेलिया पहिल्यांदाच मराठी चित्रपटात झळकत असल्याने या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच प्रतिक्रिया मिळत आहे. आता स्वप्निल जोशीने ट्विट करत या दोघांचे देखील अभिनंदन केले आहे. यावेळेस स्वप्नील जोशीने ट्विट करत म्हटले की, ““वेड” आज BO वर 50 कोटीचा गल्ला पार करेल ! केवळ क. मा. ल. कामगिरी ! मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन रितेश भाऊ, जिनिलीया वैनी आणि पूर्ण टीम!”. (Swapnil Joshi)

 

 

स्वप्निल जोशीच्या या ट्वीटवर अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनीही रिप्लाय दिला आहे. या ट्विटला रितेशने कमेंट करत म्हटले की, “भाऊ मनापासून आभार…. big hug लवकर भेटू !!!”

 

 

तर अभिनेत्री जेनेलिया देशमुख ने प्रतिक्रिया देत म्हटले की, “तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद”.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वेड या चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया सोबत अशोक सराफ,विद्याधर जोशी अशी तगडी स्टार
कास्ट पहायला मिळत आहे. वेड या चित्रपटाने आतापर्यंत 47 कोटी 66 लाख रुपये इतका गल्ला केला आहे.

 

Web Title :- Swapnil Joshi | marathi actor swapnil joshi tweet for ved movie riteish and genelia reply in marathi

 

हे देखील वाचा :

Ved Movie | ‘वेड’ चित्रपट आता नव्या रुपात; चित्रपटामध्ये करण्यात आले ‘हे’ बदल

Maharashtra Politics | ‘मागची २५ वर्षे ज्यांनी मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं तेच आज…; शिंदे गटाची ठाकरे गटावर सडकून टीका

State Education Quality Index | राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली; ‘पाचवी, आठवीतील विद्यार्थ्यांना येईना वजाबाकी, भागाकार…’

 

Related Posts