IMPIMP

Pune Crime News | चंदननगर परिसरातील जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या ‘सासु’चा छापा

by nagesh
Pune Crime News | SS cell of the pune police crime branch raided a gambling den in Chandannagar area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   – Pune Crime News | चंदननगर (Chandan Nagar, Pune) परिसरात उघडया पत्र्याच्या शेडमध्ये सुरू
असलेल्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) छापा टाकून कारवाई केली
आहे. या कारवाईत 10 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकुण 42 हजार 790
रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 10 आणि फरार असलेल्या एका अशा एकुण 11 जणांविरूध्द चंदननगर पोलिस ठाण्यात
(Chandan Nagar Police) महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्यांना पुढील कारवईसाठी चंदननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

ही कारवाई अति वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या
मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार (SR PI Vijay Kumbhar),
सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), पोलिस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे,
मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime News | SS cell of the pune police crime branch raided a gambling den in Chandannagar area

 

हे देखील वाचा :

Swapnil Joshi | स्वप्निल जोशीच्या ‘त्या’ ट्वीटवर रितेश आणि जिनिलीयाने दिला मराठीत रिप्लाय; म्हणाले – ‘तुमच्या शुभेच्छांसाठी…’

Ved Movie | ‘वेड’ चित्रपट आता नव्या रुपात; चित्रपटामध्ये करण्यात आले ‘हे’ बदल

State Education Quality Index | राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली; ‘पाचवी, आठवीतील विद्यार्थ्यांना येईना वजाबाकी, भागाकार…’

 

Related Posts