IMPIMP

Pune Crime News | पुण्यात राष्ट्रध्वजाचा अवमान ! पोलिसांकडून चौकशी सुरू; ‘प्री इंडिपेंडेंस डे’ कार्यक्रमादरम्यान घडला प्रकार (व्हिडीओ)

by sachinsitapure
Pune Crime News | Insult of the national flag in Pune! Investigation started by police; The incident took place during the 'Pre-Independence Day' program

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | देशात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे. स्वतंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्री इंडिपेंडेंस डे’ (Pre Independence Day) कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अवमान (Desecration of National Flag) झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार (Pune Crime News) पुण्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील फ्रिक सुपर क्लब (Freak Super Club) येथे घडली. याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून (Pune Police) चौकशी सुरु आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर फ्रिक सुपर क्लब येथे ‘प्री इंडिपेंडेंस डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुझिकल कॉन्सर्ट दरम्यान एका गायकानं मंचावर गाणं सादर करत असताना हातातील देशाचा तिरंगा प्रेक्षकांमध्ये भिरकावून राष्ट्रध्वजाचा अवमान केला. याबाबत अॅड. आशुतोष भोसले (Adv. Ashutosh Bhosle) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Pune Crime News)

अॅड आशुतोष भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ‘शांती पीपल’ नावाच्या म्युझिकल बँड कडून ‘प्री इंडिपेंडेंस डे’
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. यावेळी उमा शांती नावाची कलाकार हिने गाणं सादर करत असताना
हातात भारताचा तिरंगा (झेंडा) घेतला होता. सादरीकरणाच्या वेळेस तिने देशाचा झेंडा हातात फिरवून समोर असलेल्या
ऑडियन्समध्ये फेकून दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. भोसले यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी चौकशी
सुरु केली आहे. याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मुंढवा पोलिसांनी दिली.

Web Title : Pune Crime News | Insult of the national flag in Pune! Investigation started by police; The incident took place during the ‘Pre-Independence Day’ program

 

Related Posts