IMPIMP

Maharashtra Police | आपत्कालीन परिस्थीत मृत्यू झालेल्या पोलिसांच्या विधवांसाठी गृह विभागाचा मोठा निर्णय

by sachinsitapure
Maharashtra Police | Maharashtra home department big decision for widows of policemen who died in emergency situation

मुंबई : रकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police | राज्यात नक्षलवादी (Naxalite), अतिरेक्यांविरोधात कारवाई (Operations Against Terrorist) तसेच दरोडेखोरी (Robbery), संघटित गुन्हेगारी विरोधी कारवाई आणि आपत्कालीन काळात मदत करताना मृत (Dead) आणि जखमी (Injured) झालेल्या पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या (Maharashtra Police) विधवा पत्नीला (Widow Wife) आता आर्थिक लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने (State Government) पुनर्विवाह केल्यानंतर शहिदांच्या पत्नीचे वेतन बंद केले होते. त्यामुळे विधवांनी पुनर्विवाह (Remarriage) केलेल्या शहिदांच्या कुटुंबाची आर्थिक फरफट होत होती.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

राज्य सरकारकडून पुनर्विवाह केला आहे अशा विधवा पत्नीस कुटुंबीय या नात्याने दिवंगत अधिकारी/कर्मचारी (Maharashtra Police) यांच्या सेवानिवृत्तीच्या (Retirement) दिनांकापर्यंत वेतन देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे दिवंगत पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या पुनर्विवाह केलेल्या विधवांना 13 ऑगस्ट 2013 च्या निर्णयानुसार राज्य सरकारच्या निर्णयातील तरतुदी प्रमाणे संपूर्ण वेतनाचा (Salary) लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांच्याकडून पुनर्विवाह केलेल्या शहिदांच्या विधवांना दिलासा मिळाला आहे.

पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या मृत्यूनंतर विधवा पत्नीला शासनाकडून वेतन दिले जाते. मात्र पुनर्विवाह केल्यानंतर शहिदांच्या पत्नीचे वेतन बंद करण्यात येत होते. त्यामुळे राज्यातील अनेक शहिदांच्या पत्नी व कुटुंबीयांनी यासंदर्भात अनेक तक्रारी केल्या होत्या. विधवांनी पुनर्विवाह केल्याने शहिदांच्या कुटुंबियांची फरफट सुरु होती.

हमीपत्र द्यावे लागेल

दिवंगत जवानांच्या उत्पन्नावर सर्वस्वी अवलंबून असणाऱ्या दिवंगत जवानाचे वयोवृद्ध आई-वडील,
अविवाहीत/दिव्यांग बहीण/भाऊ व अज्ञान पाल्य यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल.
तसे हमीपत्र संबंधित घटक प्रमुखांना संबंधित विधवांकडून घ्यावे लागेल.
दिवंगत जवानांच्या उत्पन्नावर सर्वस्वी अवलंबून असणाऱ्याच व्यक्तींचे पालन-पोषण करण्यात येत नसेल,
तर संपूर्ण वेतनाचा लाभ बंद केला जाईल. तसेच याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने निराकारण झाल्यास
पुढील संपूर्ण वेतनाचे प्रदान पुन्हा सुरु करण्यात येईल.

Web Title :  Maharashtra Police | Maharashtra home department big decision for widows of policemen who died in emergency situation

 

 

Related Posts