IMPIMP

Sanjay Raut | ‘तर मिठी नदीत प्रेतं तरंगताना दिसली असती..,’ मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर संजय राऊत यांचे सत्ताधाऱ्यांना खडे बोल

by nagesh
Sanjay Raut | sanjay raut used the wrong word for bjp leader narayan rane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Sanjay Raut | संजय राऊत (Sanjay Raut) आणि नारायण राणे यांच्यातील वाक् युध्द काही संपण्याचे नाव घेत नाही. या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. त्यावर आज बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच नुकतच भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना मकरसंक्रांतीच्या शुभमुहुर्तावर गोड बोलण्याचे आवाहन केले होते. त्यावर निशाना साधत संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले, गोड बोलण्यासाठी मला स्वतःचा पक्ष सोडून भाजपमध्ये जायची गरज नाही. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांची ईडी चौकशी आणि विधानपरिषद निवडणूक यांवर देखील यावेळी बोलताना भाष्य केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दावोस दौऱ्यावर गेले आहेत. त्यावर माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता. ते म्हणाले, ‘दावोसवरून काय येईल, हे आम्हाला माहित नाही. पण तुमच्या नाकासमोरून जे उद्योग पळवून नेले. ते आधी परत आणा. मिहान आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून एअरबस, वेदांता फॉक्सकॉन असे दोन लाख कोटींच्या वरची गुंतवणुक असलेले प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यात गेले आहेत. ती अगोदर घेऊन आलात तर दावोसला जाण्यात अर्थ आहे. तसेच, राज्यातून गेलेल्या प्रकल्पांविषयी जर मुख्यमंत्र्यांना कुठे जाण्याची गरज असले तर ती गुजरातला आहे. असा खोचक सल्ला देखील त्यांनी (Sanjay Raut) यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

 

कोविड काळात हाती घेतलेल्या कामात मोठा गैरव्यवहार झाला असा आरोप करत मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘ केंद्रीय तपास यंत्रणा आणि सत्ता हातात असल्यामुळे खोटी प्रकरणे निर्माण करून बदनामीची मोहीम राबवली जात आहे.
महाराष्ट्र आणि मुंबईत उत्तरप्रदेश प्रमाणे गंगेत प्रेतं तरंगली नाहीत.
प्रत्येकाला आम्ही उपचार देऊ शकलो, प्राण वाचवू शकलो. हे उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे यश होते.
मुंबई महापालिका, प्रशासन यांच्या सर्वांचे यश होते.
नाहीतर मुंबईच्या मिठी नदीत देखील प्रेतं तरंगताना दिसली असती.
ज्या कायद्यानुसार तातडीने निर्णय घेण्याची गरज होती, त्यानुसारचं निर्णय घेण्यात आले आहेत.
मी खात्रीने सांगतो हे व्यवहार अतिशय पारदर्शक पध्दतीने झाले आहेत.’
असेही यावेळी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच हे सरकार पूर्ण न्याययंत्रणा ताब्यात घेऊ पाहत आहे, असे ज्येष्ठ विधीज्ञ कपील सिब्बल यांनी सांगितले.
याआधी सरकारने संपूर्ण सरकारी यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत.
आणि आता न्यायव्यवस्थेवर हातोडा घालण्याचे काम सरकारकडून होत आहे.
असा आरोप देखील यावेळी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर केला.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut used the wrong word for bjp leader narayan rane

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime News | धक्कादायक ! धंद्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न, 14 जणांवर FIR; आळंदी परिसरातील घटना

Buldhana Accident | धक्कादायक! 19 वर्षीय विद्यार्थ्याचा बाईक अपघातात दुर्दैवी मृत्यू

 

Related Posts