IMPIMP

Pune Crime News | पीएमपीमधून जाताना गर्दीत युवतीची छेड काढणारा जेरबंद

by sachinsitapure
Pune Crime News | Prisoner molesting young woman in crowd while passing through PMP

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पीएमपीमधून (PMPML Bus) जाताना गर्दीत युवतीच्या पाठीवरुन हात फिरवून तिचा विनयभंग (Molestation) करणार्‍याला पोलिसांनी (Pune Police) पकडले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

प्रतिक रामबृज जैस्वाल Pratik Rambrij Jaiswal (वय २०, रा. बरसेरवॉ, पो. बहादूरपूर, आजमगड, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. याबाबत हांडेवाडी येथील एका १६ वर्षाच्या युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११८१/२३) दिली आहे. हा प्रकार हडपसरमधील गाडीतळ येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हडपसर येथील गाडीतळ बसस्टॉप (Gadital Bus Stop Hadapsar)
येथून बसमध्ये चढत होत्या. त्यांच्या मागोमाग आरोपी प्रतिक हा चढत असताना त्याने त्यांच्या पाठीवरुन हात फिरवला
व त्यांच्याशी अश्लिल चाळे केले. तेव्हा या युवतीने हिंमत दाखवून त्याला मारले.
तरीही तो तिचा पाठलाग करुन पुन्हा तिच्या पाठीमागे हात फिरवून तिचा विनयभंग केला.
पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले (Assistant Police Inspector Thorbole) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Prisoner molesting young woman in crowd while passing through PMP

Related Posts