IMPIMP

Pune Crime News | पुणे : पगाराचे पैसे मागितल्याने तरुणाला दगडाने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

by sachinsitapure
Beating

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पगाराचे पैसे मागितल्याच्या रागातून तीन जणांनी एका तरुणाला दगडाने मारहाण (Beating) करुन जखमी केल्याची घटना थेऊर येथे घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Pune Police) तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.8) थेऊर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे घडला. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत मेहबुब हुसेन शेख (वय-27 रा. गणेश वाडी, थेऊर ता. हवेली) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शाहीद नागेश अक्कलकोटकर, नागेश अक्कलकोटकर, आरीफ अक्कलकोटकर यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेहबुब याने त्याच्या पगाराचे पैसे शाहीद अक्कलकोटकर याच्याकडे मागितले.
याचा राग मनात धरुन नागेश याने तिथेच पडलेला दगड उचलून मेहबुब याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
तर नागेश व आरीफ यांनी फिर्यादी याला हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी (Threats to kill)
दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts