IMPIMP

Pune Crime News | आई सोबत असेलल्या अनैतिक संबंधामुळे तरुणाचा ‘गेम’, पुण्यातील मंगळवार पेठेतील घटना

by sachinsitapure
Pune Crime News | Pune Crime News: Hadapsar Police Station - Son Killed Father Who Abused Liquor

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | आई सोबत असलेल्या अनैतिक संबंधाचा (Immoral Relationship) राग मनात धरुन आईच्या प्रियकराचा डोक्यात फरशी व उखळ मारुन खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. ही घटना मंगळवार पेठेतील लाकडी वखारी समोर रविवारी (दि.19) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक करुन एकाला ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

प्रतीक ऊर्फ लल्या पृथ्वीराज कांबळे Pratik alias Lalya Prithviraj Kamble (वय 31, रा. मंगळवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोकुळ नंदू चव्हाण (वय २०, रा. मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीराज सोनू भारत पाटोळे Sriraj Sonu Bharat Patole (वय-19 रा. मंगळवार पेठ) याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. मयत प्रतीक याचे एका आरोपीच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे आरोपी आणि प्रतिक यांच्यात वाद झाला होता. यानंतर अनेकवेळा त्यांच्यात वाद झाले होते. प्रतिक याने आरोपीला मारहाण देखील केली होती. याचा राग आरोपीच्या मनात होता. रविवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील वखारीसमोर प्रतीक व आरोपी सोनू, व अल्पवयीन मुलगा गप्पा मारत थांबले होते. (Pune Crime News)

त्यावेळी आरोपींनी दारू प्यायली होती. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
आरोपी सोनू आणि त्याच्या साथीदाराने प्रतीकच्या डोक्यात फरशी मारली.
फिर्यादी प्रतीकला सोडवण्यासाठी गेला असता आरोपीने ‘मला सोड मी खूप वैतागलो आहे मला काय त्रास आहे मलाच माहिती’,
असे म्हणत फरशी मारली.

तर अल्पवयीन मुलाने त्याठिकाणी असलेला दगडी उखळ प्रतीकच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले.
प्रतीकला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (PI Mangesh Jagtap) करीत आहेत.

Related Posts