IMPIMP

Pune Crime News | तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करुन विनयभंग, दत्तवाडी परिसरातील घटना

by sachinsitapure
Rape Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो मित्राच्या इन्स्टाग्रामवर व व्हॉट्सअॅपवर शेअर करुन तरुणीचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 2016 ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दत्तवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी एका तरुणावर पर्वती पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) शनिवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. यावरुन आदेश अनिल बगाडे Adhesh Anil Bagade (वय-26 रा. पाचगणी, जि. सातारा) याच्यावर आयपीसी 354ड, 500, 506 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी यांना वारंवार फोन करून त्याच्यासोबत प्रेमसंबंध (Love Affair) ठेवण्याची मागणी केली. तरुणीला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill)
देऊन स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो त्याचा
मित्र अभिजीत पाटेकर याच्या इन्स्टाग्रामवर व अभिजीतचा मित्र पंकज याच्या व्हॉट्सअॅपवर पाठवून
फिर्यादी यांची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

Related Posts