IMPIMP

Pune Crime News | वृद्ध आई-वडिलांना मानसिक व शारीरीक त्रास न देण्याचे पुणे न्यायालयाचे उच्च शिक्षित मुलगा व सुनेला आदेश

by sachinsitapure
Pune Court

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | उच्च शिक्षित मुलाकडून व सुनेकडून मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याबाबत वृद्ध आई-वडिलांनी पुणे न्यायालयात (Pune Court) दाद मागितली. न्यायालयाने वृद्ध दांम्पत्याची बाजू ऐकून घेत मुलगा व सुनेला आई-वडिलांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास दवू नये असा आदेश 17 वे सह न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, पुणे (Associate Magistrate First Class) न्यायाधीश डॉ. जी.आर. डोरनलपल्ले (Judge Dr. G.R. Dornalpalle) यांनी दिले आहे. वृद्ध दाम्पत्याच्या बाजूने अ‍ॅड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam) यांनी न्यायालयात बाजू मांडली. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

वृद्ध दांम्पत्याने मुलाला उच्च शिक्षण देऊन त्याचे लग्न लावून दिले. मात्र, लग्नानंतर मुलाने वयोवृद्ध आईला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. मुलाकडून त्रास होत असल्याने वृद्ध आईने अ‍ॅड. प्रसाद निकम यांच्या मार्फत न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली अर्ज करुन दाद मागितली. मुलाकडून होत असलेल्या त्रासामुळे आईने मुलगा व सुनेविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायदा (Domestic Violence Act) कलम 18, 19, 20, 22 व 23 प्रमाणे दावा दाखल केला. (Pune Crime News)

या दाव्यात कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आईचा अर्ज मंजूर केला. यावेळी न्यायालयाने निष्कर्ष काढताना, अर्जदार (आई) यांना मुलगा व सुनेकडून कौटुंबिक हिंसाचार होत असल्याचे दिसून येत आहे व त्यामुळे मुलगा व सुन यांच्याकडून अर्जदार (आई) यांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रास देऊ नये, असा संरक्षणात्मक आदेश पारित केला.

या प्रकरणात अर्जदार (आई) यांच्यावतीने अ‍ॅड. प्रसाद निकम यांनी बाजू मांडली. तसेच त्यांना अ‍ॅड. मन्सूर तांबोळी,
अ‍ॅड. तन्मय देव व अ‍ॅड. शुभम बोबडे यांनी मदत केली.

Related Posts