IMPIMP

Pune Crime News | फरासखाना पोलिस स्टेशन : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धावत्या ट्रेनमधून गुन्हेगार पसार; हावडा दुरंतो एक्सप्रेसमधील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune Faraskhana Police Station: Criminal run away from a running train; Incident in Howrah Duronto Express

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे पोलिसांच्या (Pune City Police) हातावर तुरी देऊन धावत्या ट्रेनमधून गुन्हेगार (Criminal) पळून गेल्याची घटना हावडा -पुणे दुरंतो एक्सप्रेसमध्ये (Howrah- Pune Duronto Express) नागपूर ते बुटीबोरी (Nagpur to Butibori) दरम्यान घडली. संजय तपनकुमार जाना Sanjay Tapankumar Jana (रा. गोपीनाथ भीतरजाल, प. बंगाल) असे या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) ६ मे रोजी फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय जाना व सौरभ प्रसन्नजीत माईती (Saurabh Prasannajit Maiti) हे दागिने घडविणार्‍या व्यवसायिकाकडे कामगार म्हणून काम करत होते. दागिने घडविण्यासाठी दिलेले ३८१ ग्रॅम सोने घेऊन पळून गेले होते. पुणे पोलिसांचे पथक त्यांना पकडण्यासाठी पश्चिम बंगालला गेले होते. संजय जाना याला घेऊन फरासखाना पोलिसांचे पथक पुण्याकडे हावडा – पुणे दुरंतो एक्सप्रेसच्या बी -८ कोचमध्ये बसवून पोलीस पुण्याकडे येत होते. (Pune Crime News)

शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संजय जाना याने बाथरुमला जायचे आहे, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला टॉयलेटजवळ नेले. आरोपी संजय याने आतून दार बंद केले. बराच वेळ होऊनही तो बाहेर येण्याचे नाव घेत नसल्याने पोलिसांनी टॉयलेटचा दरवाजा ठोठावला. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना शंका आली.

त्यानंतर त्यांनी कसेबसे दार उघडले असता आरोपी टॉयलेटची खिडकीची काच फोडून उडी घेऊन पळून गेल्याचे दिसून आले.
नागपूर रेल्वे पोलिसांकडे (Nagpur Railway Police)

याबाबतचा गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Crime News | Pune Faraskhana Police Station: Criminal run away from a
running train; Incident in Howrah Duronto Express

Related Posts