IMPIMP

Pune Crime News | पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाला डोकं फुटेपर्यंत मारहाण, धनकवडी परिसरातील घटना

by sachinsitapure
Sahakar Nagar Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीत येणं जावयाला (Son-in-Law) चांगलेच महागात पडले आहे. सासरकडच्या लोकांनी संगनमत करुन घरगुती भांडणावरून (Domestic Dispute) जावयाला डोकं फुटेपर्यंत बेदम मारहाण केली. यामध्ये जावयी गंभीर जखमी झाला असून हा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. हा प्रकार रविवारी (दि.10) दुपारी दोनच्या सुमारास धनकवडी (Dhankawadi) येथील मयुर कॉम्प्लेक्समध्ये घडला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Pune Police) चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत राजेश तुळसीराम उणेचा (वय-34 रा. कुलभुषण सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रोड, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सासू हेमलता मुलचंद डांगी (वय-50), सासरे मुलचंद पुकराज डांगी (वय-55), मेहुणा प्रथमेश मुलचंद डांगी आणि पुजा मुलचंद डांगी (सर्व रा. मयुर कॉम्प्लेक्स, धनकवडी) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश उणेचा हे पत्नीला भेटण्यासाठी धनकवडी येथे सासुरवाडीला गेले होते.
त्यावेळी सासरच्या लोकांनी संगनमत करुन घरगुती कारणावरुन फिर्यादी यांच्या सोबत वाद घातले.
यानंतर त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तर सासू हेमलता डांगी यांनी कोणत्यातरी जड वस्तूने फिर्यादी
यांच्या डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.

Related Posts