IMPIMP

Pune Crime News | भाडेकरुला कोयत्याने मारहाण, आईला अटक तर मुलगा ताब्यात; तळजाई वसाहत परिसरातील घटना

by sachinsitapure
Sahakar Nagar Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | घरात भाडेकरु ठेवल्याच्या कारणावरून शिवीगाळ (Abuse) करुन भाडेकरुला (Tenant) कोयत्याने मारहाण केल्याची घटना तळजाई वसाहत परिसरात घडली आहे. याप्रकरणी आई आणि अल्पवयीन मुलावर गुन्हा (FIR) दाखल करुन आईला अटक केली आहे तर मुलाला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार (Pune Crime News) बुधवारी (दि.23) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी 26 वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. अनिता टायगर आरण्ये (वय-38) आणि 17 वर्षीय मुलावर आयपीसी 394, 504, 34 आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या घरामध्ये भाडेकरु ठेवला आहे.
घरात भाडेकरु ठेवल्याच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी व भाडेकरु यांना शिवीगाळ केली.
तसेच आरोपी महिलेच्या मुलाने भाडेकरू देवा गौतम याच्या डाव्या हाताच्या दंडावर उलटा कोयता (Koyta) मारुन
मारहाण करुन जखमी केले. तसेच भाडेकरुच्या खिशातील 1900 रुपये जबरदस्तीने काढून ते आईकडे दिले.
याप्रकरणी अल्पवयीन मुलागा आणि त्याच्या आई विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Related Posts