IMPIMP

Pune Crime News | पुण्यातील कन्स्ट्रक्शन कंपनीची पावणे 2 कोटींची फसवणूक; प्रोजेक्ट डायरेक्टरसह चार जणांवर FIR

by sachinsitapure
Cheating Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कन्स्ट्रक्शन कंपनीने (Construction Company) भाड्याने घेतलेल्या सामानाची परस्पर विक्री करुन कंपनीची फसवणूक (Cheating Case) करणाऱ्या प्रोजेक्ट डायरेक्टर (Project Director) आणि इतर दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तसेच चढ्या दराने वर्क ऑर्डरला (Work Order) मंजुरी देऊन कमीशन घेणाऱ्या स्ट्रक्चरल जनरल मॅनेजरवर (Structural General Manager) देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कंपनीची पावणे दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार (Pune Crime News) जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2023 दरम्यान खराडी येथील एआयजीपी (AIGP,), आयटीपीपी प्रोजेक्ट (ITPP Project) तसेच वेक्टर प्रोजेक्ट (Vector Project), प्रतिक कलेक्शन येथील एल अँड डब्ल्यु कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या (L & W Construction Company Pvt. Ltd.) कार्यालयात घडला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबप्रकरणी एल अँड डब्ल्यु कंन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. चे जनरल मॅनेजर सिक्युरिटी (General Manager Security) राहुल सुबीर बॅनर्जी Rahul Subir Banerjee (वय-46 रा. ग्रीन वर्ल्ड को ऑप सोसायटी, कालवा, ठाणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रोजेक्ट डायरेक्टर विजयकुमार माथनकुमार (Vijayakumar Mathankumar), जनरल मॅनेजर स्ट्रक्चरल बसवराज चन्नागी (Basavaraj Channagi) यांच्यासह इतर दोघांवर आयपीसी 406,408, 409, 420, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एल अँड डब्ल्यु कंन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. येथे जनरल मॅनेजर सेक्युरीटी या पदावर कार्यरत आहेत. तर आरोपी विजयकुमार माथनकुमार कंपनीत प्रोजेक्ट डायरेक्टर या पदावर काम करत होते. कंपनीने कन्स्ट्रक्शन कामासाठी लागणारे साहित्य भाड्याने घेतले आहे. या सामानाची जबाबदारी विजयकुमार यांच्याकडे होती. आरोपीने आपल्या पदाचा गैरवापर करुन इतर दोघांच्या मदतीने या साहित्याची परस्पर विक्री करुन कंपनीची 1 कोटी 34 लाख 78 हजार 164 रुपयांची फसवणूक केली केली. तसेच कंपनीला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य पुरवणाऱ्या व्हेंडर, सब कॉन्ट्रॅक्टर यांची बिले मंजूर करुन मोठ्या प्रमाणात कमीशन घेऊन कंपनीचा विश्वासघात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

तर बसवराज चन्नागी हे कंपनीत जनरल मॅनेजर स्ट्रक्चरल या पदावर काम करत होते.
त्यांनी कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे काम न करता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी
ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (Oriental Rail Infrastructure Pvt. Ltd.) व
टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज प्रा. लि. (Technocraft Industries Pvt. Ltd.) या रजिस्टर व्हेंटर यांच्या वर्क ऑर्डरला चढ्या
दराने मंजुरी दिली. त्या मोबदल्यात चन्नागी यांनी कमीशन म्हणून बी.सी. कन्सल्टंट (B.C. Consultant) या पत्नीच्या
नावे असलेल्या फर्मच्या बँक खात्यात 47 लाख 9 हजार 561 रुपयांचे कमीशन स्वीकारून कंपनीची फसवणूक (Fraud) केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Related Posts