IMPIMP

Pune Crime News | एअर इंडियात सेटिंग! 40 टक्के सवलतीत विमान तिकीट मिळवून देण्याच्या आमिषाने इंजिनिअरची फसवणूक

by sachinsitapure
Air India

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | एअर इंडियामध्ये (Air India) आपली सेटिंग आहे. त्यांच्याकडील तिकीटाचा कोटा असून त्यावरुन ४० टक्के डिस्काऊंटमध्ये तिकीट (Ticket Discount) मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची (Software Engineer) २ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत ताथवडे येथे राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १००८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लविश जैन (रा. पिंपरी चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खराडी येथील कंपनीत कामाला आहेत.
त्यांचा मित्र कॅनडा येथे किचन ट्रॉलीज बनविण्याचा व्यवसाय करतो. त्याची पत्नी गर्भवती आहे. तिची डिलिव्हरीसाठी मित्राने त्याचा आईला कॅनडाला पाठविण्यासाठी विमान तिकीटाची सोय करुन कॅनडाला पाठव, अशी विनंती केली होती. फिर्यादीचा दुसर्‍या मित्राने लविश जैन हे तिकीट मिळवून देतो, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी लविश जैन याच्याशी संपर्क साधला. त्याने आपले एअर इंडियामध्ये सेटिंग आहे. त्याच्याजवळ तिकीटाचा काही कोटा असतो. त्यातील तिकीट तो विकत असतो. तेव्हा फिर्यादीने कॅनडाचे रिटर्न तिकीट चेक केले. तेव्हा ते २ लाख ४० हजार रुपये एवढे होते. फिर्यादी याने ते सांगितल्यावर जैन याने त्या तिकीटावर ४० टक्के डिस्काऊंट करुन देतो, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने १ लाख ३० हजार रुपये पाठविले. १८ ऑगस्टचे तिकीट बुक झाले असून ते दोन दिवस अगोदर मिळेल, असे सांगितले. फिर्यादी याने १६ ऑगस्टला फोन केल्यावर त्याने ती फ्लाईट रद्द झाली आहे. त्यामुळे मी तुम्हाला तिकीट पाठवू शकत नाही, असे सांगितले. (Pune Crime News)

तुमचे दुसर्‍या फ्लाईटचे तिकीट बुक करुन देतो, तुम्ही दिलेले पैसे तुम्हाला तीन दिवसात परत करतो.
नविन तिकीटासाठी १ लाख ४० हजार रुपये पाठवा, असे सांगितले.
त्यानुसार त्यांनी पुन्हा जैन याच्या खात्यावर १ लाख ४० हजार रुपये पाठविले.
त्याने २२ ऑगस्ट रोजी फ्लाईट असल्याचे सांगितले.
परंतु, त्यानंतर त्यांनी वारंवार फोन केल्यानंतरही त्यांचा फोन घेतला नाही की तिकीट दिले नाही. तसेच पैसेही परत केले नाही.
त्यामुळे आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यावर या सॉफ्टवेअर इंजिनिअरने पोलिसांकडे धाव घेऊन
फिर्याद दिली आहे.

Related Posts