IMPIMP

Pune Crime News | विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात कारागृह पोलीस हवालदारासह तिघांना अटक

by sachinsitapure
arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | सुनेला नीट स्वयंपाक करता येत नाही म्हणून मानसिक (Mental Harassment) व शारीरीक छळ (Physical Harassment) करुन तिला आत्महत्येस (Suicide in Pune) प्रवृत्त केल्याबद्दल कारागृह पोलीस हवालदारासह (Yerwada Jail Police Constable) तिघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलीस हवालदार माणिक भवार (Police Constable Manik Bhawar), बाळू भवार, शाहाबाई भवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आश्विनी बाळु भवार Ashwini Balu Pawar (वय २५) अशी आत्महत्या (Suicide Case) केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत अश्विनीची आई सुनंदा परमेश्वर पवार (वय ४७, रा. पवडुऴ जि. बीड) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५२८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती, सासू, सासरे व दीरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१५ पासून २८ जुलै २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिक भवार हे येरवडा कारागृहात हवालदार असून नियुक्तीला असून
जेल वसाहतीत राहतात. त्यांचा मुलगा बाळु आणि आश्विनी यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता.
आश्विनी हिला किरकोळ कारणावरुन मारहाण (Beating) व शिवीगाळ केली जात. तुला नीट स्वंयपाक करता येत नाही़
भांडी घासता येत नाहीत, असे म्हणून वारंवार शिवीगाळ करुन तिचा मानसिक व शारीरीक छळ केला जात होता.
या छळाला कंटाळून आश्विनी हिने जेल वसाहतीत २८ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक काटे (PSI Kate) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | three arrested including a jail police constable in the case of suicide of a married woman

हे देखील वाचा

Related Posts