IMPIMP

Pune Crime News | जुन्या भांडणातून दोन भावांवर कोयत्याने सपासप वार, कात्रजमधील प्रकार; कोयता गँगमधील एकाला अटक

by sachinsitapure
Attempt to kill

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | जुन्या भांडणाचा राग मनात धरून पाच जणांनी दोन भावांवर कोयत्याने सपासप वार (Stabbing) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. हा प्रकार कात्रज येथील जैन मंदिर रस्त्यावरील शांती मंदिराच्या भिंतीजवळ मंगळवारी (दि.12) रात्री साडे दहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) पाच जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत तुषार सुरेश जाधव Tushar Suresh Jadhav (वय-26 रा. दत्तनगर पोलीस चौकी मागे, आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संकेत रेणुसे, ओंकार पवार, प्रथमेश येणपुरे आणि इतर दोन अनोळखी मुलांवर आयपीसी 307, 323, 504, 143, 144, 147, 148, 149 सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arms Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला असून संकेत रेणुसे याला अटक केली आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार जाधव यांना फटक्यांची ऑर्डर मिळाली होती.
त्यामुळे फिर्यादी हे त्यांचा भाऊ मयुर जाधव याला सोबत घेऊन फटाके देण्यासाठी जैन मंदिर येथून चालले होते.
त्यावेळी आरोपी संकेत रेणुसे याने फिर्यादी यांचा भाऊ निखील जाधव याच्यासोबत 2019 मध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी यांना शिवीगाळ केली.

तर संकेत रेणुसे याच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेला भाऊ मयुर याच्यावर कोयत्याने
(Koyta Gang) सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तुषार आणि मयुर जाधव जखमी झाले आहेत.
तुषार यांनी बुधवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींचा शोघ घेऊन संकेत रेणुसे
याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts