IMPIMP

Pune Crime News | जबरी चोरी व दुचाकी चोरणारे दोन अल्पवयीन मुंढवा पोलिसांच्या ताब्यात, 2 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime News | Two minors in Mundhwa police custody for forced theft and two-wheeler theft, seized property worth 2 lakh 28 thousand

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहरात दुचाकी आणि जबरदस्तीने मोबाईल चोरणाऱ्या (Mobile Thief) दोन अल्पवयीन मुलांना (Minors) मुंढवा पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी 5 दुचाकी आणि 6 मोबाईल असा एकूण 2 लाख 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime News) शुक्रवारी (दि. 30 जून) मुंढवा रेल्वे ब्रिज (Mundhwa Railway Bridge) खाली केली.

मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार दिनेश राणे (Dinesh Rane) व स्वप्नील रासकर (Swapnil Raskar) यांना माहिती मिळाली की, मुंढवा रेल्वे ब्रीज खाली चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी दोन अल्पवयीन मुले येणार आहेत. मिळालेल्या माहितीची पोलिसांनी खातरजमा केली असता दोन जण थांबल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी जबरदस्तीने मोबाईलची चोरी तसेच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून रोख रक्कम, 6 मोबाईल, झाडा झुडपात लपवून ठेवलेल्या चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींकडून मुंढवा पोलीस ठाण्यातील चार तर हडपसर पोलीस ठाण्यातील (Hadapsar Police Station) तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त विक्रम देशमुख (DCP Vikram Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior PI Vishnu Tamhane), पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदिप काकडे (PI Pradeep Kakade), सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे (API Sandeep Jore), पोलीस अंमलदार दिनेश राणे, वैभव मोरे, महेश पाठक, राहुल मोरे, स्वप्नील रासकर, सचिन पाटील यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | Two minors in Mundhwa police custody for forced theft and two-wheeler theft,
seized property worth 2 lakh 28 thousand

Related Posts