IMPIMP

Pune Crime News | आत्महत्या करण्यापुर्वी बनवला व्हिडीओ अन् इमारतीच्या 6 व्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाची आत्महत्या, कोंढवा परिसरातील घटना

by sachinsitapure
Suicide Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कामावर आला नसल्याबाबत सासऱ्यांच्या समोर बोलल्याचा राग आल्याने एका तरुणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Committed Suicide) केली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकावर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.30) सकाळी सव्वा आठच्या सुमारास कौसर बाग परिसरात घडली. (Pune Crime News)

तोहिद मेहमूद शेख (वय-25 रा. कौसरबाग, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तोहित शेख हा अरबाज वली मोहम्मद मेमन यांचेकडे ड्रायव्हर व सुपरवायझर म्हणुन चार वर्षापासून नोकरी करत होता. त्या दोघांमध्ये बुधवारी कामावर न आल्यावरुन वाद झाला होता. अरबाज मेमन हे तोहितच्या सासऱ्यांसमोर त्याला बोलले होते. याचे तोहित याला वाईट वाटले. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

यातूनच तोहित याने कौसरबाग (Kausarbag) परिसरात काम चालु असलेल्या एका इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून
उडी मारून (Jumping) आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी प्राथमिक तपास करुन आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तोहित याने सावकाराच्या
जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांनी सावकारीचा कोणताही विषय नसल्याचे सांगितले आहे.

Related Posts