IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – परिचारिकेच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Vimannagar Police Station - A case has been registered against the boyfriend in the case of suicide of a nurse

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | लोहगावमधील धानोरी (Dhanori Lohegaon) जकात नाका येथील विमल हॉस्पिटलमध्ये (Vimal Multispeciality Hospital And Research Centre ) गळफास घेऊन परिचारिकेने आत्महत्या (Suicide In Pune) केली होती. या प्रकरणी आता तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नवीन गाडी घेण्यासाठी तो तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. पैसे दिले नाही तर तिला मारहाण करीत असल्याचे समोर आले आहे. अश्विनी देविदास राठोड Ashwini Devidas Rathod (वय २१) अस आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे़ तिचे वडिल देविदास राठोड (वय ५४, रा. संभाजीनगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२१/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बापू किसन मैद Bapu Kisan Maid (वय २२, रा. संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अश्विनी आणि बापू मैद यांचे प्रेमसंबंध होते.
अश्विनी विमल हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करीत असे.
बापू हा अश्विनीकडे नवीन गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी करत होता. पैसे दिले नाही तर तिला मारहाण करीत असे.
त्यांच्या पैशांची मागणी वाढल्याने व त्याच्या त्रासाला कंटाळून अश्विनी हिने विमल हॉस्पिटलमधील रुममध्ये
७ एप्रिल २०२३ रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून
पोलीस उपनिरीक्षक साळवी (PSI Salvi) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Vimannagar Police Station – A case has been registered against the boyfriend in the case of suicide of a nurse

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | प्रियकराबरोबर पळून जाताना पत्नीने घरातील दागिने, रोकड नेली चोरुन; अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या पत्नीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल

IPS Nilesh Ashtekar | आयपीएस निलेश अष्टेकर यांच्याविरूध्द पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल, शरीर सुखाची मागणी केल्याचा विधवा महिलेचा दावा

Pune Crime News | सिंहगड कॉलेज परिसरात टोळक्यांचा पुन्हा धुडगुस ! पालघन घेऊन पसरत होते दहशत, सराईत गुंडांसह 5 जणांना अटक

 

Related Posts