IMPIMP

Pune Crime News | वाकडेवाडी: स्विगीच्या डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा केला विनयभंग; म्हणाला – ‘तुम … करोगी?’

by sachinsitapure
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | सॅनटरी पॅडची (Sanitary Pad) डिलिव्हरी घेवुन आलेल्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने (Swiggy Delivery Boy) महिलेला तुम सेक्स करोगी? असे विचारुन विनयभंग (Molestation) करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत वाकडेवाडी येथील एका २६ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३२१/२३) दिली आहे. त्यानुसार स्विगीच्या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्वीगी वरुन त्यांचे घरगुती सामानाची ऑर्डर केली होती.
आलेले सामान तपासत असताना त्यात सॅनटरी पॅडची पॅकिंग फोडलेले दिसल्याने त्यांनी फाटलेल्या सॅनटरी पॅडचा
फोटो स्वीगीला पाठविला. कंपनीने सॅनिटरी पॅड घेऊन नवीन डिलिव्हरी बॉयला त्यांच्या पत्त्यावर पाठविले.
आरोपी डिलिव्हरी बॉयने फिर्यादीस नवीन पॅड देऊन पेमेंटबाबत विचारणा केली. तेव्हा फिर्यादी यांनी त्यास स्विगीशी बोलून घ्या, असे सांगितले. त्यावर त्या डिलिव्हरी बॉयने मोबाईल फोन चार्जिगचे निमित्त करुन फिर्यादीचे घरात प्रवेश केला. फिर्यादीला तुम सेक्स करोगी? असे म्हणून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न करुन अश्लिल हावभाव करुन त्यांचा विनयभंग केला.

Related Posts