IMPIMP

Pune Crime News | येरवडा कारागृहात पुन्हा सापडले मोबाईल, कारागृह सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; तिघांवर FIR

by sachinsitapure
Yerwada Central Jail

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहरातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerwada Central Jail) मोबाईल सापडण्याच्या (Mobiles Found) घटना वारंवार समोर येत आहेत. कारागृहाची सुरक्षा तोडून आतमध्ये मोबाईल नेले जात असल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Pune Crime News) येरवडा कारागृह परिसरात तीन मोबाईल सापडले असून तिघांवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

निरंजन उर्फ निलेश बाळू शिंदे, महेश राजू पांचारिया यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कारागृह अधिकारी सुदर्शन खिलारे (Jail Officer Sudarshan Khilare) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. (Pune Crime News) येरवडा कारागृह रक्षकांनी कैदी नीलेश शिंदे याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या एका पिशवीमध्ये मोबाईल, बॅटरी आणि सिम कार्ड आढळून आले.

राज्यात सर्वात मोठे आणि बंदी संख्या जास्त असलेले कारागृह म्हणून येरवडा कारागृहाकडे पाहिले जाते.
कारागृह परिसरामध्ये यापूर्वी देखील अनेक वेळा मोबाईल सापडले आहेत.
यानंतर कारागृहातील सुरक्षा कडक करण्यात आली होती. तरीही वारंवार मोबाईल सापडण्याच्या घटना घडत आहेत.
त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Posts