IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – क्रिकेट खेळताना इयत्ता 8 वी तील मुलाचा ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, उन्हाळी सुट्टीतील दुर्देवी घटना

by nagesh
Pune Crime News | Wanwadi Police Station - Class 8 boy dies of cardiac arrest while playing cricket, tragic incident during summer vacation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये क्रिकेट खेळताना ह्दयविकाराच्या झटक्याने आठवीतील एका
विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू (Student Death Due To Heart Attack) झाल्याची धक्कादायक घटना वानवडी परिसरातील विकासनगरमध्ये (Vikas
Nagar Wanwadi) उघडकीस आली आहे. (Pune Crime News)

 

वेदांत शिवाजी धामणगावकर (14, रा. विकासनगर, वानवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस स्टेशनमध्ये (Wanwadi Police Station) अकस्मिक मृत्यूची (Accidental Death) नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वेदांत हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेत होता. आठवडयाभरापुर्वीच शाळेला सुट्टी लागली आहे. त्यामुळे तो गुरूवारी सकाळी मित्रांसमवेत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. क्रिकेट खेळता खेळता त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याने त्याच्या वडिलांना फोन करून संपर्क साधला. त्याच्या आई-वडिलांनी वेदांतला तात्काळ वानवडी परिसरातील एका हॉस्पीटलमध्ये दाखल केले. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वेदांत बेशुध्द पडला होता. हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी त्यास एखाद्या मोठया हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर त्याला फातिमानगर परिसरातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये (Hospital In Fatima Nagar) दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारांपुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ह्दयविकाराच्या धक्क्याने वेदांतचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Sr PI Bhausaheb Pathare) यांनी याप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Wanwadi Police Station – Class 8 boy dies of cardiac arrest while playing cricket, tragic incident during summer vacation

 

हे देखील वाचा :

Maharashtra Prisons Implements New Policy | कारागृहातील शिक्षाधीन पुरुष व महिला बंदी व न्यायाधीन महिला बंद्यांची कारागृहाबाहेरील मुले, नात-नातू व भाऊ -बहीण यांना समक्ष गळा भेट (Video)

Chandrashekhar Bawankule | ‘महाविकास आघाडीतील नेतेच अजितदादांना जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत’ – चंद्रशेखर बावनकुळे (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | अत्याधुनिक तंत्रज्ञानातून पारदर्शक आणि गतिमान सेवा पुरवाव्यात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

Related Posts