IMPIMP

Maharashtra Prisons Implements New Policy | कारागृहातील शिक्षाधीन पुरुष व महिला बंदी व न्यायाधीन महिला बंद्यांची कारागृहाबाहेरील मुले, नात-नातू व भाऊ -बहीण यांना समक्ष गळा भेट (Video)

by nagesh
 Maharashtra Prisons Implements New Policy | Meeting of male and female under-trial prisoners and female under-trial prisoners in front of their children, grandchildren and brothers and sisters outside the prison

सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Prisons Implements New Policy | कारागृहातील शिक्षा बंद्यांची शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आणि समाजाने त्यांना स्वीकृत करून समानतेची वागणूक मिळावी आणि बंद्यांना आपल्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व आपुलकी निर्माण होण्याच्या दृष्टीने शिक्षाबंदी आणि त्यांची १६ वर्षाखालील मुले यांची समक्ष भेट घडवून आणणे आवश्यक आहे,जेणेकरून समक्ष भेटीत बंदी व त्यांची मुले यांच्यामध्ये सुसंवाद झाल्याने शिक्षणाबाबत व घरगुती अडचणी सोडवण्यास मदत होऊ शकेल ,यास्तव कारागृहात शिक्षाधीन पुरुष व महिला बंदी व न्यायाधीन महिला बंद्यांची कारागृहाबाहेरील सोळा वर्षाखालील मुलांची समक्ष भेट देण्यात येत होती. (Maharashtra Prisons Implements New Policy)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या कार्यालयाकडून सूचना पत्र व परिपत्रक निर्गमित करून कार्यवाही केली जात होती.

 

 

कारागृहातील बंद्यांचे नैराश्य कमी होण्याकरिता व कौटुंबिक परिस्थितीबाबत जाणीव होण्याच्या दृष्टीने तसेच बंदी व नातेवाईक यांच्यामधील सुसंवाद सुलभ व्हावा त्यांच्या समक्ष भेटी सुलभ व्हाव्यात व कारागृह विभागाचे ” सुधारणा व पुनर्वसन ” या ब्रीद वाक्याचा उद्देश साध्य होणेच्या दृष्टीने कारागृहातील बंद्यांच्या कारागृहाबाहेरील असलेल्या मुले,नातू-नातू व भाऊ-बहीण यांना प्रत्यक्ष समक्ष भेटी देण्याबाबत नव्याने समावेश करण्यात येत आहे. यामुळे बंद्यांच्या नात-नातू यांच्या शिक्षणाबाबत व कौटुंबिक अडचणी सोडवण्यास मदत होईल. मुले,नात -नातू ,भाऊ-बहीण यांची समक्ष भेट,तसेच रक्ताच्या नातेवाईकांचा होणारा मायाळू स्पर्श होऊन बंद्यास जगण्याची नवी उमेद निर्माण होईल व नात -नातू ,भाऊ-बहीण ,मुले यांनाही बंद्यांविषयी कृतज्ञता वाटून नवीन ऊर्जा मिळून कारागृह प्रशासनाविषयी आपुलकीची भावना वाढीस लागेल. याबाबत कार्यवाहीकरिता राज्यातील सर्व कारागृह अधीक्षकांना आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कारागृहातील बंदी व नातेवाईक यांचेमध्ये निश्चितच समाधानाचे व आपुलकीचे वातावरण निर्माण होईल. (Maharashtra Prisons Implements New Policy)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Prisons Implements New Policy | Meeting of male and female under-trial prisoners and female under-trial prisoners in front of their children, grandchildren and brothers and sisters outside the prison

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | ‘महाविकास आघाडीतील नेतेच अजितदादांना जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत’ – चंद्रशेखर बावनकुळे (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | अत्याधुनिक तंत्रज्ञानातून पारदर्शक आणि गतिमान सेवा पुरवाव्यात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

Related Posts