IMPIMP

Pune Crime | वीज कट करण्याचा बहाणा करुन कोंढव्यातील 8 जणांची एकाचवेळी फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Fraud of youth on official toll free number of finance company; 7.5 lakhs cheated by asking to generate a new credit card PIN

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | वीज बिल (Light Bill) भरले नसल्याने तुमचा विद्युत पुरवठा खंडीत केला जाईल, असा मेसेज पाठवून त्यांनी संपर्क साधल्यावर त्यांना क्वीक सपोर्ट अ‍ॅप डाऊन लोड करायला सांगून फसवणूक (Fraud Case) करण्याचे प्रकार संपूर्ण देशभर घडताना दिसत आहे. कोंढव्यातील ८ जणांची साडेसहा लाख रुपयांची एकाचवेळी अशाच प्रकारे फसवणूक (Cheating Case) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका ४४ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२७६/२२) दिली आहे. फिर्यादी या घरी असताना त्यांना एमएसईबी येथून कुमार बोलत असल्याचे सांगून तुमचे लाईट बिल भरणे बाकी आहे. बिल न भरल्यास तुमची इलेक्ट्रसिटी कनेक्शन कट करण्यात येईल असे सांगितले. तेव्हा त्यांनी आम्ही दोन तीन दिवसांपूर्वीच लाईट बील भरल्याचे सांगितले. तुम्ही भरलेल्या बिलाची (Light Bill) रक्कम आमच्या अकाऊंटवर दिसत नाही़ असे सांगून बिलाची पावती ऑनलाईन पाहण्यासाठी एमएसईबीचे एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यांनी ती लिंक डाऊनलोड केली. त्यात विजेचे भरलेले बिल दिसत होते. त्यानंतर मला मी भरलेले वीज बिलाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे की नाही हे पाहण्यासाठी आणखी एक क्विक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले़ व त्यानुसार त्यांनी ते डाऊनलोड करुन बँकेची माहिती भरली. तसेच त्यांना अ‍ॅपमध्ये १०० रुपये जमा करण्यास सांगितले. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यानुसार त्यांनी १०० रुपये पाठविल्यावर त्यांच्याकडील अ‍ॅपमध्ये १०० रुपये जमा झाल्याचे दिसले.
त्यानंतर समोरील व्यक्तीने फोन कट केला. काही वेळाने त्यांना आयडीबीआय बॅकेतून फोन आला.
तुमच्या अकाऊंटवरुन १६ हजार रुपये तुम्ही कोणाला पाठवले आहे असे विचारुन तुमच्या खात्यावरुन कोणीतरी अज्ञात व्यक्ती पैसे काढण्याचा वारंवार प्रयत्न करत असल्याचे नोटीफिकेशन येत असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी आपली फसवणूक केली जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. तेव्हा त्यांच्या प्रमाणेच कोंढवा परिसरातील (Kondhwa Crime News) इतर आणखी ७ जणांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आल्याचे दिसून आले. एकूण ८ जणांची ६ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे आढळून आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Simultaneous fraud of 8 people in Kondhwa on the pretext of power cut

 

हे देखील वाचा :

Tunisha Sharma Death Case | तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Pune Crime | पत्नीच्या प्रियकराचा पतीवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; संगमवाडी गावठाणातील घटना

Bigg Boss Marathi Season 4 | बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेता रितेश देशमुखने केले असे काही स्पर्धक झाले थक्क

 

Related Posts