IMPIMP

Pune Crime | पत्नीशी का बोलतो, असे म्हणून पतीने केला तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station - Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | पत्नीशी का बोलतो, असे म्हणून पतीने तरुणावर जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. डोक्यात केलेल्या या मारहाणीमुळे तरुण बेशुद्ध पडला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विशाल कामठे Vishal Kamthe (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल महादेव मगर (व २७, रा. वनपुरी, ता. पुरंदर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Lonikalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६९/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष माणिक जाधव Santosh Manik Jadhav (रा. वडकीनाला) याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

हा प्रकार वडकीनाला येथील ज्योती लॉजजवळ २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल कामठे हा बारावी शिकला असून सध्या काही काम धंदा करत
नाही. तो एका महिलेला भेटण्यासाठी ज्योती लॉजसमोर गेला होता.
यावेळी संतोष जाधव तेथे आला व त्याने तिच्याशी बोलतो, भेटतो, या कारणावरुन चिडुन जाऊन विशाल याला
लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी दांडक्याने शरीरावर तसेच डोक्यात मारहाण केली.
त्यात विशाल हा गंभीर जखमी झाला व बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांनी त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केली आहे.
तो बेशुद्ध असल्याने पोलिसांनी मामाची फिर्याद घेतली असून पोलीस उपनिरीक्षक हंबीर अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | The husband tried to kill the young man because he was talking to his wife; FIR at Loni Kalbhor Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मैत्रिणीला पॉर्न स्टारच्या प्रसिद्धीसह पैशाचे आमिष; मित्रांनी व्हिडिओ केला अश्लील साईटवर प्रसारित, पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक प्रकार

Pune Crime | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या मुलाच्या खूनातील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे; न्यायालयाची फसवणूक

Kirit Somaiya | शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांना सोमय्यांचे चॅलेंज, म्हणाले – ‘संजय अंधारीला…’

 

Related Posts