IMPIMP

Pune Crime | पुण्यात गुन्हेगारांचा पुन्हा ‘राडा’ ! हातात धारदार हत्यारे घेऊन घातला नंगानाच

by nagesh
Pune Crime | Damage to houses due to rock blasts due to mine blast for riverine wells; The water tank burst in the incident in Kharadi, some people were injured due to stones

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीतील कळस गावठाणामध्ये (Kalas Gaothan) रात्री अकराच्या सुमारास धुडगूस घातला. 15 ते 20 जणांच्या टोळक्याने 2 दुचाकी आणि 4 रिक्षांची कोयत्यानं तोडफोड (Vehicle Vandalism) केली आहे. रात्री उशिरा तरुणांनी धुडगूस घालून परिसरात दहशत (Pune Crime) निर्माण केली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी 15 ते 20 जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद (FIR) दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळस परिसरात दोन गटात (Group) वाद झाल्यानंतर, तरुणांच्या टोळक्याने हातात तलवारी, कोयते आणि इतर हत्यारे घेत परिसरात दहशत माजवली आहे. आरोपींनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्या फोडत नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

रविवारी रात्री 11 च्या सुमारास घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
ज्यामध्ये काही तरुण हातात प्राणघातक हत्यारे घेऊन धावताना दिसत आहे.
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धुडगूस घालणाऱ्या दोन्ही गटातील संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे धानोरीतील मुंजाबा वस्ती मध्ये (Munjaba Settlement in Dhanori) देखील 8 ते 10 जणांच्या टोळक्याने कोयते, तलवारी, दांडके घेऊन दुकाने आणि टपऱ्यांची तोडफोड करत आरडाओरडा करुन दशहत माजवली होती.
त्यामुळे एकंदरीतच विश्रांतवाडी पोलिसांचा गुन्हेगारांवरील (Criminals) वचक कमी झाला असल्याने हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याची परिसरात चर्चा आहे.

 

Web Title :- Pune Crime | two gang to terrorize in pune vishrantwadi area

 

हे देखील वाचा :

Top Return Stocks | एक वर्षात 4 पट झाले पैसे, ‘या’ 7 शेयरने दिला चांगला रिटर्न; जाणून घ्या

EPFO ने दूर केली पेन्शनधारकांची चिंता, महिना संपण्यापूर्वीच मिळेल पेन्शन; जाणून घ्या

Pune Crime | धक्कादायक ! ऑफिसमध्ये घुसून तरुणीवर चाकू हल्ला, बारामतीमधील आज सकाळी 10.30 ची घटना

 

Related Posts