IMPIMP

Pune Crime | दरोडा टाकताना तोंडाचा ‘सुटला’ रुमाल अन् आरोपींची पटली ‘ओळख’ अन् पुढं झालं असं काही…

by nagesh
Pune Crime | Company robbery gang jailed, Unit Six performance; 12 Crime detection

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कारने जात असताना दोन मोटारसायकलवरुन पाच जण आले. त्यांनी कारचालकाला अडवून धमकावले. त्यांना गाडीतून खाली उतरवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन एकलून दिले. त्यांची कार घेऊन जाताना आरोपींच्या तोंडाला बांधलेले रुमाल सुटल्याने कारचालकाने त्यांना (Pune Crime) ओळखले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी धर्मराज पोपट वाघमारे (वय ३०, रा. कडबनवाडी, शेळगाव, ता. इंदापूर) यांनी वालचंदनगर पोलिसांकडे (walchandnagar police station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी (गु. र. नं. ३६५/२०२१), IPC ३९५ (dacoity) कलमाखाली राजू भाळे (रा. खोरोची, ता. इंदापूर), सचिन शिंदे (रा. बोरी, ता. इंदापूर) व त्यांच्या इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कडबन वाडी गावचे हद्दीत राम मंदिराच्या अलिकडे 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता घडली (Pune Crime) होती.

फिर्यादी हे त्यांच्या कारने जात असताना दोन मोटारसायकलवरुन आलेल्या पाच जणांनी त्यांना अडविले. त्यांना कारमधून उतरवले. त्यांच्या गळ्यातील 1 लाख 17 हजार रुपयांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावले व ते कार घेऊन पळून जाऊ लागले. तेव्हा त्यांच्या तोंडावरील रुमाल सुटल्याने त्यांनी दोघा आरोपींना ओळखले. या आरोपींचा नंबर मिळवून त्यांनी सोन्याची चैन व गाडी परत दे अशी विनवणी केली. तेव्हा त्यांनी परत फोन केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

त्यामुळे त्यांनी घाबरुन पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती.
त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी ते व त्यांचा भाचा प्रशांत राऊत हे आरोपी रहात असलेल्या खोरोची गावाकडे गाडीचा शोध घेण्यात जात
असताना फिर्यादींना त्यांची कार निरवांगी गावात खोरोचीकडे जाणार्‍या रोडवर दिसली.
त्यामध्ये आरोपी व एक अनोळखी व्यक्ती होती. फिर्यादी यांना पाहून ते गाडी सोडून पळून गेले.
त्यानंतर फिर्यादी गाडी घेऊन घरी परत आले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस पोलिसांत तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर आता नातेवाईकांनी धीर दिल्याने शुक्रवारी त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक लातुरे अधिक तपास करीत आहे.

 

Web Title :- Pune Crime | Walchandnagar police of pune rural arrest four in robbery case

 

हे देखील वाचा :

Pune Crime | UAE च्या ‘दिरहम’ चलनाच्या नोटा बदलून देण्याच्या नावाखाली फसवणूक; बिबवेवाडी पोलिसांकडून चौघांना अटक

Brief Emotion Charge | शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या रडण्यावर लावला जादा ‘चार्ज’, वायरल झाले बिलाचे ट्विट

New Sim | आता ‘हे’ ग्राहक खरेदी करू शकणार नाहीत नवीन सिम, जाणून घ्या सरकारचे बदललेले नियम

 

Related Posts