Pune Crime | तुझ्या वडीलांनी उमेदवारी अर्ज माघारी का घेतला नाही म्हणत एकास मारहाण

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | खेड तालुक्यातील चांदुस (Chandus News) येथील एक धक्कादायक घटना समोर (Pune Crime) आली आहे. तुझ्या वडिलांचा सोसायटीच्या निवडणुकीत भरलेला उमेदवारी अर्ज माघारी का घेतला नाही. या कारणावरुन एकास लोखंडी झाऱ्याने मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत संदीप निवृत्ती कारले (Sandeep Nivrutti Karale) (रा. चांदूस, ता. खेड) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तीघांवर खेड पोलिस ठाण्यात (Khed Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update
याबाबत माहिती अशी की, याप्रकरणी काळूराम तात्याभाऊ बढे (Kaluram Tatyabhau Badhe), किरण देवराम बढे (Kiran Devram Badhe)
आणि काळूराम बढे यांच्या घरातील 2 मुले (नाव माहित नाही) (हे सर्व रा. चांदूस ता. खेड) असं गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे आहेत. चांदुस येथील
रानवारा ढाब्यावर फिर्यादी जेवण करण्यासाठी गेले होते. दरम्यान तिथे अगोदरच आरोपी होते. तुझ्या वडीलांचा सोसायटीचा फाँर्म मागे का घेतला नाही
या कारणावरून फिर्यादी आणि आरोपी यांची निवडणुकीच्या वादातुन मारहाण झाली.
या दरम्यान, चौघांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी काळूराम बढे याने हाँटेलमधील लोखंडी झारा फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादी संदीप कारले (Sandeep Karale) याला जखमी केले. दरम्यान याप्रकरणी अधिक तपास खेड पोलिस (Khed Police Station) करीत आहेत.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update
Web Title :- Pune Crime | why didnt your father withdraw his candidature incidents khed of pune district
Holiday Calendar | सन 2022 मध्ये साप्ताहीक सुट्टीच्या दिवशीच 8 शासकिय सुट्ट्या
Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 120 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Comments are closed.