IMPIMP

Pune Crime | प्रवाशांचे मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या बंडगार्डन पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | On the pretext of helping to cross the road, a gold ring worth 1 lakh was stolen

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनपरदेशात राहून पुण्यात (Pune Crime) आलेला तरुण व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर त्याने मोबाईल (Mobile theft in pune) आणि वाहनचोरी (vehicle theft in pune) चे गुन्हे केले. आरोपी ओला रिक्षा (Ola Auto) किंवा बसची वाट पाहत थांबणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल हिसकावून (Mobile snatching) पळून जात होता. या सराईत गुन्हेगाराच्या पुण्यातील (Pune Crime) बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden police) मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून 17 मोबाइल व 4 दुचाकी असा एकूण 3 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

नोएल अ‍ॅलन शबान Noel Allan Shaban (वय-23 रा. सर्किट हाऊस जवळ, क्विन्स गार्डन, रेल्वे पुलाखाली, कोरेगाव पार्क) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी यश सुंदरलाल जैन (रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गुरुवार (दि.16) सकाळी आठच्या सुमारास ससून हॉस्पिटलजवळ (Sassoon Hospital) ओला रिक्षाची वाट पाहत उभे होते. त्यावेळी आरोपीने त्यांच्या हातातून मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. दरम्यान याच परिसरातून मोबाइल आणि दुचाकी चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. (Pune Crime)

 

या गुन्ह्यांचा तपास करत असताना तपास पथकाने रस्त्यावरील तब्बल 150 सीसीटीव्ही तपासले. संशयित आरोपीचा शोध घेत असताना आरोपी कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथे राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घराजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ससून हॉस्पिटल आणि पुणे स्टेशन (Pune station) परिसरातून 17 मोबाइल चोरल्याची कबुली दिली. तसेच रेल्वे स्टेशन, गाडीतळ चौक, येरवडा (Yerawada) आणि पौड (Paud) येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे मोबाइल आणि दुचाकी जप्त करण्यात आले आहे. आरोपीवर पुणे शहरात यापूर्वी 14 गुन्हे दाखल आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले की, आरोपी हा व्यसनी असून तो यापूर्वी परदेशात (अमेरिका) राहिलेला आहे. त्याला वडिल नसल्याने आणि आई बेडवर आहे. तसेच तो व्यसन करण्यासाठी सवय आहे. आईच्या आजारपणासाठी आणि व्यसन करण्यासाठी चोरी करत होता.

त्याच्या कुटुंबात देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी (ACP Yashwant Gawri),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Senior Police Inspector Pratap Mankar),
पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते (Police Inspector Ashwini Satpute)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar),
पोलीस उपनिरीक्षक विशाल माने (PSI Vishal Mane), पोलीस अंमलदार फिरोज शेख, हरिष मोरे, प्रताप गायकवाड,
नितीन जगताप, सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, अमोल सरडे, संजय वणवे, सागर घोरपडे, किरण तळेकर, अंकुश खानसोळे यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Bundgarden police arrested criminals steals passenger’s mobile and two-wheeler, seizes Rs 3 lakh

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील मिळकतींची करपात्र रक्कम निश्‍चित करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

MahaTET Exam Scam Case | टीईटी पेपरफुटी प्रकरण ! प्रीतीश देशमुखचा वर्ध्यात राजवाडा, कोट्यवधींची जमवली माया

Instant Quick Online Loan | ‘इन्स्टंट लोन’ घेण्यापुर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष दिल्यास तात्काळ होईल तुमचं काम, जाणून घ्या

 

Related Posts