IMPIMP

Pune Cyber Crime | क्रिप्टो एक्सचेंज सुरु करणार्‍या पुण्यातील व्यावसायिकाची डेव्हलपर्सकडून फसवणूक; सर्व्हर हॅक करुन 2 लाख 34 हजार क्रीप्टॉक्स टोकन वळविले

by Team Deccan Express
Pune Crime | State Bank was robbed of 19 lakhs by cyber thieves in the name of the director of the famous Sarafi Pedhi.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Cyber Crime | क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchange) सुरु करीत असलेल्या एका पुण्यातील व्यावसायिकाला (Businessman In Pune) व्हिएतनाममधील डेव्हलपरने (Software Developer In Vietnam) आपल्या साथीदारांच्या मदतीने २ लाख ३४ हजार क्रीप्टॉक्स टोकन (Cryptoxx Token) स्वत:कडे वळवून फसवणूक (Cheating Case) केल्याचे उघडकीस आले आहे. (Pune Cyber Crime)

याप्रकरणी बावधन (Bavdhan Pune) येथे राहणार्‍या एका २९ वर्षाच्या व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद (१५/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वो थी हाँग Vo Thi Hong Diep (रा. व्हिएतनाम), वांग जंग (ट्रान व्हॅन विन्ह) Wang Jung (Tran Van Vinh) , न्युदेनखाक थिन्ह NguydenKhac Thinh (सर्व रा. व्हिएतनाम) आणि सुमा अख्तर Suma Akhtar (रा. बांगला देश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ जानेवारी ते २५ एप्रिल २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Cyber Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer ) आहेत. त्यांची कंपनी आहे. ते क्रिप्टो एक्सचेंज सुरु करीत आहेत. त्यासाठीचे व्हिएतनाममधील वांग जंग (व्हिएतनाम) याला कोडिंग करण्याचे काम दिले होते. १७ एप्रिल रोजी फिर्यादी यांचा सर्व्हर अचानक बंद पडला. तो सुरु करण्यास त्यांना तीन दिवस लागले. त्यानंतर त्यांनी पाहिले तर त्यांच्या सर्व्हरवर असलेले सर्व टोकन गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी ही बाब वांग जुंग याला सांगितली. तेव्हा त्याने कोणीतरी सर्व्हर हॅक केला असून त्याने सर्व टोकन घेतले आहेत. मात्र, फिर्यादी यांनी केलेल्या तपासात हे सर्व काम वांग युंग यानेच केल्याचे उघड झाले.

कोडिंगचे काम करीत असताना त्यांनी या डेटामधील कंपनीचे हॉट व्हॉलेटची प्रायव्हेट की (Hot Wallet Private Key) व सर्व्हरचे इतर पासवर्ड चोरले (Change Password Of Server) . कंपनीच्या सर्व्हरमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन सर्व्हरवरील हॉट वॉलेटमधील २३ हजार ६०४ डॉलर (Dollar) अंदाजे २३ लाख ८८ हजार ३२० रुपयांचे एकूण २ लाख ३४ हजार १३४ क्रीप्टॉक्स टोकन ऑनलाईन पद्धतीने स्वत:चे व साथीदारांच्या खात्यावर युएसडीटी टोकनमध्ये वळून फिर्यादी यांची फसवणूक (Fraud Case) केली आहे. फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी (Police Inspector Ankush Chintamani) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Cyber Crime | Pune-based businessman who started crypto exchange cheated by Software Developer In Vietnam; Server hacked 2 lakh 34 thousand Cryptoxx tokens

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts