IMPIMP

Pune District Mining Crusher Industries Association | पुणे जिल्हा खाण क्रशर उद्योग संघाच्या वतीने बेमुदत संप

by nagesh
Pune District Mining Crusher Industries Association | Indefinite strike on behalf of Pune District Mine Crusher Industry Association

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune District Mining Crusher Industries Association | खाण क्रशर उद्योगातील शासनाच्या जाचक अटी व
बदलती शासकिय धोरण या विरोधात पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने (Pune District Mining Crusher Industries Association) 9
डिसेंबर पासून बेमुदत संप केला आहे. पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजकांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला
असल्याची माहिती संघटनेचे सचिव योगेश ससाणे (Secretary Yogesh Sasane) यांनी सांगितले.

 

योगेश ससाणे म्हणाले, गौणखनिजाबाबत शासनाच्या जाचक अटी व गौणखनिज वाहतुकीबाबत बदलती धोरणं यामुळे संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. प्रशासनाकडून दिवसा शहरामध्ये गौणखनीजाची वाहतूक करण्यास परवानगी नाही. तसेच वाहनांवर जीपीएस लावण्याची अट घातली आहे. रात्री वाहतूक केली तर बांधकाम व्यावसायिक माल घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पुणे शहरात सकाळी सहा नंतर रात्री पर्य़ंत गौणखनीजाची वाहतूक करण्यास परवानगी नाकारली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शासनाच्या या धोरणांविरोधात चर्चा करण्यासाठी 9 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व खाण व क्रशर उद्योजकांची
बैठक आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये शासनाच्या धोरणा विरोधात बेमुदत संप करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
तसेच 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये पुढील रणनिती आखली जाणार असल्याचे संघटनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

Web Title : Pune District Mining Crusher Industries Association | Indefinite strike on behalf of Pune District Mine Crusher Industry Association

 

हे देखील वाचा :

Curry Leaves Benefits | रोजच्या आहारात कढीपत्त्याचा करा समावेश, डायबिटीज-कोलेस्ट्रॉलसह या आजारांचे काम होईल तमाम

Pune Crime | किरकोळ कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, हडपसर परिसरातील घटना

Nandurbar Police | खाकी वर्दीची अशीही सेवा, मृतदेहांची हेळसांड थांबवण्यासाठी अंत्यसंस्कारासाठी दिली 4 टन लाकडे; नंदुरबार पोलिसांचा सुत्य उपक्रम

Weight Loss | झोपण्यापूर्वी प्या हे ३ ड्रिंक्स, ‘जिम’ला न जाता होईल कॅटरिनासारखी फिगर

 

 

Related Posts