IMPIMP

Pune HSC Students Suicide | पुण्यात 12 वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, आई-वडिलांना बसला मोठा धक्का

by nagesh
Pune Crime | Youth commits suicide after being robbed after threatening to spread nude photos viral; Shocked by the second incident in a row

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune HSC Students Suicide | आज (बुधवार) दुपारी एक वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल (Online Result) जाहिर झाला. यानंतर पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली. बारावीत नापास (Fail) झालेल्या एका विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या (Pune HSC Students Suicide) केली. निखील लक्ष्मण नाईक Nikhil Laxman Naik (वय-19 रा. श्रावणधारा वसाहत) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. निखील हा गरवारे महाविद्यालयात (Garware College) वाणिज्य (Commerce) शाखेत शिक्षण घेत होता. आज निकाल लागणार असल्याने तो निकालाबाबत खुपच उत्सुक होता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच तो इमारतीच्या वर गेला. तेथून त्याने खाली उडी मारली. खाली उभे असलेल्या शेखर लोणारे Shekhar Lonare (वय-30) यांच्या अंगावर तो पडला. यामध्ये लोणारे गंभीर जखमी झाले. तर निखिलचा जागीच मृत्यू झाला. लोणारे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. निखल याला क्रिकेटची आवड होती. तसेच बॉडी बनवण्यसाठी त्याने जीम सुरु केली होती. तो शांत स्वभावाचा होता. त्याचे वडील आचारी तर आई घरकाम करते. निखिलच्या जाण्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

 

निखिलच्या जाण्याने श्रावणधारा वसाहतीमधील नागरिकांनी दु:ख व्यक्त केले. सुरुवातीला झोपडपट्टी असलेल्या या जागेत आता चौदा मजली इमारत उभी राहिली आहे. कष्टकरी कुटूंबातील आशेचा किरण असलेल्या तरुण मुलगा गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title :- Pune HSC Students Suicide | after result 12th failed students suicide in kothrud of pune

 

हे देखील वाचा :

Shambhuraj Desai | बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले – ‘पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं, खडसेंचंही तेच झालं; याचा परिणाम… ‘

Pune Pimpri Crime | पतीचा खून करुन केला गळफास घेतल्याचा बनाव, पत्नीवर FIR

 

Related Posts