IMPIMP

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट, इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Kidney Racket | Ruby Hall's managing trustee in the illegal kidney transplant case, Dr. Parvez Grant, 15 others, along with 4 other well-known doctors; Huge excitement

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Kidney Racket | पुण्यातील एक धक्कादायक घटना (Pune Crime) समोर आली आहे. किडनी (Pune Kidney Racket) काढून फसवणूक (Fraud Case) केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. यामुळे शहरात खळबळ उडाली होती. 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून किडनी काढून घेतली मात्र पैसेच दिले नाहीत, असा आरोप किडनी दान केलेल्या महिलेने एका दलालाविरोधात केला. त्यानंतर या प्रकरणाचा सर्वप्रथम ‘लोकशाही न्यूज’चे पत्रकार चंद्रशेखर भांगे यांनी प्रकरणाचा चांगलाच पाठपुरावा केला. पुणे पोलिसांनी देखील प्रकरणाचा तपास सुरू केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महिलेचे ऑपरेशन झाल्याचंही उघड झालं. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आता संबंधित रूबी हॉलच्या मॅनेजिंग ट्रस्टीसह डाॅक्टरांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी अमित आण्णासाहेब साळुंखे (Amit Annasaheb Salunkhe), सुजाता अमित साळुंखे (Sujata Amit Salunkhe) (दोघे रा. पुणे), आण्णासाहेब साळुंखे (Annasaheb Salunkhe) (रा. सोलापूर), शंकर हरीभाऊ पाटील (Shankar Haribhau Patil), सुनंदा हरीभाऊ पाटील (Sunanda Haribhau Patil), रवि गायकवाड (Ravi Gaikwad), अभिजीत मदने (Abhijeet Madne), डाॅ. परवेज (Dr. Purvez Grant), रुबी हॉस्पीटलच्या उपसंचालक रेबेका जाॅन (Rebecca John), मंजुषा कुलकर्णी (Manjusha Kulkarni), डॉ. अभय सद्रे (Dr. Abhay Sadre), डॉ. हिमेश गांधी (Dr. Himesh Gandhi), डॉ. भूपात भाटी (Dr. Bhoopat Singh Bhati) सुरेखा जोशी (Surekha Joshi) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

या घटनेमध्ये महिलेकडूनही हॉस्पिटलची फसवणूक करण्यात आली आहे. प्रत्यारोपण करताना महिलेने वेगळ्या नावाची कागदपत्रे जमा केली. असा आरोपही पिडित महिलेवर करण्यात आला होता. दरम्यान, ऑगष्ट 2021 ते 24 मार्च (2022) या दरम्यान ही घटना घडली. 24 मार्चला पुण्यातील रुबी हाॅल क्लिनिक हाॅस्पीटलमध्ये (Ruby Hall Clinic Hospital) किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. किडनी दान करणाऱ्या या महिलेने 29 मार्च रोजी तिचे रुग्णालयात नोंदवलेलं नाव खरं नसल्याचं सांगितलं. या महिलेकडून मग पोलिसांकडे दलालाविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Pune Kidney Racket)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, पीडित महिलेनेही पोलिसांना पत्र दिले आहे.
किडनी देण्यासाठी आपल्याला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, हे पैसे मिळाले नसून, आपली फसवणूक झाल्याचे सांगितले आहे.
त्याचबरोबर या महिलेच्या तक्रारीनंतर रुबी हॉल क्लिनिकनेही पोलिसांना पत्र दिले.
त्यात किडनी ट्रान्सप्लॉन्टसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची विभागीय समितीने तपासणी करून त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे.
त्यानंतरच ही शस्त्रक्रिया झाली आहे. यात अन्य लोक सहभागी असल्याचा संशय असून, त्यांचा शोध घेण्याची विनंती पत्रात केली होती.

 

Web Title :- Pune Kidney Racket | Ruby Hall’s managing trustee in the illegal kidney transplant case, Dr. Parvez Grant, 15 others, along with 4 other well-known doctors; Huge excitement

 

हे देखील वाचा :

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

HDL Cholesterol | न्यूट्रिशनिस्टने सांगितले शरीरात ’गुड कोलेस्ट्रॉल’ वाढवण्याचे 5 सोपे उपाय, हार्ट अटॅक-स्ट्रोकपासून होईल संरक्षण

 

Related Posts