IMPIMP

Pune Koyta Gang | पती-पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना शिवाजीनगर पोलिसांकडून 24 तासाच्या आत अटक

by nagesh
Pune Koyta Gang | The accused who attacked the husband and wife with a crowbar were arrested by the Shivajinagar police within 24 hours

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गँगच्या (Pune Koyta Gang) दहशतीत वाढ झाली आहे. पोलिसांनी अनेकांना अटक (Pune Crime News) केली असली तरी कोयता गँगची (Pune Koyta Gang) दहशत कमी होताना दिसत नाही. पुण्यात कोयता गँगने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींना 24 तासात अटक (Arrest) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अनिकेत उर्फ दाद्या लक्ष्मण बगाडे (वय-21), तुषार कैलास काकडे (वय-29), दिपक उर्फ दिपु काकाराम शर्मा (वय-19 तिघे रा. एसआरए बिल्डिंग, शिंदे वस्ती, हडपसर) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी (दि.16) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास घडली. (Pune Koyta Gang)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे त्यांच्या घरासमोरील मैदानात झोपले होते. त्यावेळी चार जणांनी हातात कोयते, तलवार घेऊन त्यांच्यावर खुनी हल्ला (Murder Attack) केला. आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यात, हातावर वार केले. यावेळी फिर्यादी यांची पत्नी व मुलगा त्यांना वाचवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना देखील जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. यानंतर आरोपींनी दुचाकीवरुन जाताना कोयते, तलवार हवेत फिरवून मोठमोठ्याने आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली.

 

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींची माहिती काढली.
त्यानंतर तपास पथकाने आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर काही तासात आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे (PSI Sachin Tarde) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale)
पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (DCP Sandeep Singh Gill),
सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड (Police Inspector Vikram Goud),
सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे (API Bholenath Ahiwale), पोलीस अंमलदार अविनाश भिवरे,
गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, आदेश चलवादी, रोहित झांबरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Koyta Gang | The accused who attacked the husband and wife with a crowbar were arrested by the Shivajinagar police within 24 hours

 

हे देखील वाचा :

Raj Thackeray | राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट! उद्या कोर्टासमोर रहावे लागणार हजर

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

 

Related Posts