IMPIMP

Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

by nagesh
Sanjay Raut | sanjay raut reaction after election commission hearing on shivsena party name and bow and arrow sign

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Sanjay Raut | शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमके कुणाचे? निवडणुक आयोगातील यावरील पुढील सुनावणी आता २० जानेवारीला होणार आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षात फूट पडून सेनेचे दोन गट निर्माण झाले होते. त्यानंतर दोन्ही गटाकडून पक्षचिन्ह तसेच पक्षाचे नाव यावर दावा करण्यात येत आहे. सत्तासंघर्षाचे एक प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठापुढे सुरू असून पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव याबाबतचे प्रकरण हे निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. निवडणुक आयोगासमोरील प्रकरणावर आज (दि.१७) महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. त्यात निवडणूक आयोगाकडून या प्रकरणात पुढची तारिख देण्यात आली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपले मत व्यक्त केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाणावरच निवडून आले आहेत.
त्यांच्या एबी फॉर्मवर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची सही आहे.
ज्यांना आम्ही धनुष्यबाण चिन्ह दिलं, त्यातले काही लोकं फुटून बाहेर पडले, याचा अर्थ पक्षात फूट पडली, असे म्हणता येणार नाही. काही आमदार-खासदार निघून गेले असतील, मात्र, पक्ष जागेवर आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच पक्षातील फुटीचा जो देखावा निर्माण केला जातो, तो आभासी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत निर्णय लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करू नये.’ असे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

 

दरम्यान, येत्या काही दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत असून
त्याविषयी देखील निवडणुक आयोगास विचारण्यात येईल. असे आजच्या सुनावणी अगोदर ठाकरे गटाचे नेते
अनिल देसाई एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते. त्यावर आता येत्या २० जानेवारीला निवडणुक आयोग
काय निर्णय देणार? यावर ठाकरे गटाचे लक्ष राहील.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut reaction after election commission hearing on shivsena party name and bow and arrow sign

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | ‘आमच्याकडे बहुमत असल्याने लवकर निर्णय घ्या..,’ शिंदे गटाचा निवडणुक आयोगासमोर दावा

Maharashtra Politics | ‘औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे गटाचा खासदार होणार, चंद्रकांत खैरेंनी जाती-जीतींमध्ये भांडणं लावली’, शिंदे गटाच्या नेत्याचे गंभीर आरोप

Pune Crime News | मार्केटयार्डमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून 28 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त रितेश कुमार यांची 5 वी कारवाई

 

Related Posts