IMPIMP

Pune Lonikand Crime | पुणे : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करुन महिलेचा विनयभंग, विनयभंग करणाऱ्या पतीच्या मित्रावर FIR

by sachinsitapure
Molestation Case-Facebook

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Lonikand Crime | फेसबुकवर महिलेचा फोटो अपलोड (Upload Photo Of Woman On Facebook) करुन त्यावर अश्लील कमेंट (Obscene Comment) करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.29) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. याबाबत लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) महिलेच्या पतीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वाघोली येथे राहणाऱ्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून महादेव सुरवसे
(रा. भोसा ता. मुरुड जि. लातुर) याच्यावर आयपीसी 354 (अ), 504, 500 सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा
दाखल केला आहे (IT Act). पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या पतीचा मित्र असल्याने एकमेकांच्या परिचयाचे आहेत.(Pune Lonikand Crime)

आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ केली. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास आरोपीने त्याच्या मोबाईलवरून
फेसबुक वर महिलेचा फोटो अपलोड केला. तसेच तो फोटो व्हायरल करुन अश्लील कमेंट करुन फिर्यादी यांच्या स्त्री
मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादी यांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात
जाऊन फिर्याद दिली. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक गुन्हे सीमा ढाकणे (PI Seema Dhakane) करीत आहेत.

Related Posts