IMPIMP

Pune Sangvi Crime | इन्फोसीसचे नारायण मुर्तीं यांचा व्हिडिओ वापरुन गुंतवणूकदाराला घातला गंडा; मोठा परताव्याच्या बहाण्याने 10 लाखांची फसवणूक

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Sangvi Crime | इन्स्ट्राग्रामवर (Instagram) इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांचा कॉपिटलेक्स CAPITALIX ट्रेडिंग प्लॅटफॉर्म संबंधित व्हिडिओचा वापर करुन तरुणांचा मोठा परतावा देण्याचा बहाणा करुन १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत पिंपळे सौदागर येथील एका ३९ वर्षाच्या तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७४/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कॉपिटलेक्स चा गौरव व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. (Cheating Fraud Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याशी गौरव व त्यांच्या इतर साथीदारांनी संपर्क साधला. त्यांच्या कॉपिटलेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरील ट्रेडिंग संबंधित इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांचा व्हिडिओ पाठवला. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांची दिशाभूल करुन कॉपिटलेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचा बहाणा केला. तेव्हा फिर्यादी यांनी गुंतवणुकीची तयारी दर्शविली.

त्यानुसार त्यांना वेगवेगळे ट्रेडिंग करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी ४ डिसेंबर २०२३ ते २ फेब्रुवारी २०२४ दरम्यान वेळोवेळी
१० लाख ४ हजार रुपयांची गुंतवणुक केली. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा न देता फसवणूक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे तपास करीत आहेत.(Pune Sangvi Crime)

Related Posts