IMPIMP

Pune Crime News | मैत्रिणीनेच घरातील दागिने नेले चोरुन; चेक देऊन केला बाऊन्स

by sachinsitapure
Pune Crime News | It was the friend who stole the ornaments from the house; Check bounced

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | घरी आलेल्या मैत्रिणीनेच कपाटातील १५ ग्रॅमचे मंगळसुत्र चोरुन नेले. ही चोरी उघड झाल्यावर त्याचे चेकने पैसे देण्याचा बहाणा करुन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत एका ३९ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६५०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राखी चौधरी (रा. संघर्ष चौक, चंदननगर) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बायफ रोडवरील गंगा अल्फा पॅराडाईजमध्ये ८ जून रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी माहिला या मैत्रिणी आहेत.
राखी चौधरी ही फिर्यादीच्या घरी आली असताना तिच्या घरातील बेडरुममधील कपाटात ठेवलेले ५३ हजारांचे सोन्यांचे
मंगळसुत्र (Gold Mangalsutra) राखी हिने लबाडीने चोरुन नेले. ही चोरी लक्षात आल्यावर तिने याची रक्कम चेकद्वारे देते,
असे सांगून फिर्यादी यांना चेक दिला. दुसरीकडे बँकेत हा चेक वटवायला नको, म्हणून बँकेत न वटण्याबाबत अर्ज
करुन फिर्यादीची फसवणूक (Fraud Case) केली. सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे (API Ravindra Godse) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | It was the friend who stole the ornaments from the house; Check bounced

Related Posts