IMPIMP

Pune Police MPDA Action | पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 38 वी स्थानबध्दतेची कारवाई

by sachinsitapure
Pune Police MPDA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –Pune Police MPDA Action | समर्थ पोलिस ठाण्याच्या (Samarth Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या (Pune Crime News) अट्टल गन्हेगाराविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांची ही 38 वी कारवाई केली आहे. (Pune Police MPDA Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

फिरोज उर्फ बब्बाली मकबुल खान Feroze alias Babbali Maqbul Khan (वय-50 रा. आयना मस्जिद समोर, भवानी पेठ, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदरांसह समर्थ, कोंढवा (Kondhwa Police Station) व खडक पोलीस ठाण्याच्या (Khadak Police Station) हद्दीत सुरा, चाकू, तलवार या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, विना परवाना शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे (Pune Crime News) केले आहेत. मागील 5 वर्षात त्याच्याविरुद्ध 11 गंभीर गुन्हे (FIR) दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता.
प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी फिरोज उर्फ बब्बाली खान याला
अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे (Senior PI Suresh Shinde) ,
पी.सी.बी. गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक राजु बहिरट (PSI Raju Bahirat) यांनी केली.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 38 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
आगामी काळात देखील सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करण्यात
येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title : Pune Police MPDA Action | MPDA’s action against the criminal who terrorized the city of Pune! 38th posting action by Police Commissioner Ritesh Kumar

Related Posts