IMPIMP

Pune MCOCA Case | कर्वेनगर परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणार्‍या पप्पुल्या वाघमारेसह 9 जणांवर ‘मोक्का’, CP रितेश कुमार यांची 33 वी कारवाई

by nagesh
Pune MCOCA Case | Mokka Action On Pappulya Waghmare Gang Of Warje Malwadi Karve Nagar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune MCOCA Case | कर्वेनगर परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड (Vandalism Of Vehicles In Karve Nagar Pune) करून परिसरात दहशत निर्माण करणार्‍या पप्पुल्या उर्फ दिग्विजय तुकाराम वाघमारे (Pappulya alias Digvijay Tukaram Waghmare) आणि त्याच्या इतर 8 साथीदारांविरूध्द पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का कायद्यान्वये (Mokka Action) कारवाई केली आहे. आयुक्तांची ही आतापर्यंतची 33 वी मोक्का कारवाई आहे. (Pune MCOCA Case)

 

पप्पुल्या उर्फ दिग्विजय तुकाराम वाघमारे (19, रा. बराटे चाळ, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे), देविदास बसवराज कोळी
Devidas Basavaraj Koli (19, रा. कॅनॉल रोड, कर्वेनगर, पुणे), भगवान धाकलू खरात Lord Dhaklu Kharat (20, रा. श्रमिक वसाहत, कर्वेनगर, पुणे), लिंग्गाप्पा उर्फ नितीन सुरेश गडदे Lingappa aka Nitin Suresh Gadde (20, रा. वडारवस्ती, कर्वेनगर, पुणे), मुन्ना नदाफ Munna Nadaf (रा. रामनगर, वारजे, पुणे), सागर जमादार Sagar Jamadar (रा. वडार वस्ती, कर्वेनगर, पुणे), करण आणि त्यांच्या इतर 2 अल्पवयीन साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पप्पुल्या वाघमारे, देवीदास कोळी, भगवान खरात आणि लिंग्गाप्पा उर्फ नितीन सुरेश गडदे यांना अटक करण्यात आलेली आहे तसेच दोन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत (Pune Crime News). इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. (Pune MCOCA Case)

 

आरोपींनी आपआपसात संगणमत करून दि. 20 जून 2023 रोजी मध्यरात्री कर्वेनगर परिसरातील कॅनॉल रोड वरील दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठया प्रमाणावर तोडफोड केली होती. त्यासंदर्भात वारजे माळवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. आरोपी पप्पुल्या वाघमारेने साथीदारांना सोबत घेवुन संघटित टोळी निर्माण केली होती. दहशतीच्या मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तो आणि त्याचे साथीदार गुन्हे करीत होते.

वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे (Warje Malwadi Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (Sr PI Sunil Jaitapurkar) यांनी पप्पुल्या वाघमारे टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई होण्यासाठी पोलिस उपायुक्त सुहेश शर्मा (IPS Suhail Sharma) यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला होता. अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) प्रस्तावास मंजुरी दिली आहे. सदरील गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele) करीत आहेत. रितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आतापर्यंत तब्बल 33 संघटित टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा,
सहाय्यक पोलिस आयुक्त भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुरकर,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni),
निगराणी पथकाचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक यशवंत पडवळे (PSI Yashwant Padwale),
पोलिस अंमलदार गोणते, सचिन कुदळे, अमोल भिसे, अतुल भिंगारदिवे, विजय खिलारी आणि नितीन कातुर्डे यांची पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title : Pune MCOCA Case | Mokka Action On Pappulya Waghmare Gang Of Warje Malwadi Karve Nagar

Related Posts