IMPIMP

Pune-Mumbai Sinhagad Express | सिंहगड एक्सप्रेस सोमवार पासून धावणार, 19 महिने होती बंद

by nagesh
Pune-Mumbai Sinhagad Express | pune mumbai sinhgad express start monday 18 octomber say railway official today

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असल्याने देशातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक मार्गावरील रेल्वे (Railway) सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. परंतु पुणे-मुंबई मार्गावर धावणारी सिंहगड एक्सप्रेस (Pune-Mumbai Sinhagad Express) सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही रेल्वे सुरु करण्याची मागणी होत होती. अखेर सोमवार (दि.18) पासून पुणे-मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस (Pune-Mumbai Sinhagad Express) सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने (railway administration) घेतला आहे. गेल्या 19 महिन्यापासून ही गाडी बंद होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुण्यावरुन ही रेल्वेगाडी (क्र. 01009) सकाळी 6 वाजून 05 मिनिटांनी निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)
सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन ही गाडी (क्र.01010) सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी निघेल. रात्री 10 वाजता पुणे स्टेशन (Pune station) येथे पोहचेल.
अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही रेल्वे गाडी पुन्हा सुरु केल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत (Pune-Mumbai Sinhagad Express) आहे.

Web Title : Pune-Mumbai Sinhagad Express | pune mumbai sinhgad express start monday 18 octomber say railway official today

हे देखील वाचा :

Pune Corporation | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या महापालिकेच्या 63 कर्मचार्‍यांचे वारस अद्याप मदतीपासून ‘वंचित’; तातडीने वारसांना मदत द्यावी – पी.एम.सी.एम्प्लॉईज युनियनची प्रशासनाकडे मागणी

Pune Corporation | पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी मिळणार? महापालिका प्रशासन म्हणते…

Postal Life Insurance | पोस्ट विभागाने लाँच केला नवीन डिजिटल पोस्टल लाईफ इन्श्युरन्स बाँड, पेमेंट करणे होणार सोपे

Related Posts