IMPIMP

Pune Narayangaon ATS Action | एटीएसने नारायणगावातून ८ बांगला देशी नागरिकांना पकडले

by sachinsitapure
Bangladeshi Arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Narayangaon ATS Action | नारायणगावात बेकायदेशीरपणे राहणार्‍या ८ बांगला देशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे. (Pune Narayangaon ATS Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मेहबुल नजरुन शेख, राणा जमातअली मंडल, गफुर राजेवली शेख, आलमगीर जमातअली मंडल, शालोम मुस्तफीजुर मंडल, अफजल हमिबुल खान, कबीर मुज्जाम मुल्ला आणि जमात व्हायतअली मंडल अशी त्यांची नावे आहेत. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी आठ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची एटीएसकडून चौकशी करण्यात येत आहे.

भारत बांगला देश सीमेवरील मुलकी अधिकार्‍यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरी करुन या बांगला देशी नागरिकांनी भारतात प्रवेश करुन अवैधरित्या वास्तव्य करत असताना मिळून आले आहे. (Pune Narayangaon ATS Action)

भारत बांगला देशाच्या सीमेवरील गावाचे रहिवासी असल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन या बांगला देशी नागरिकांनी नारायणगावात वास्तव्य केले. या कागदपत्राच्या आधारे त्यांनी ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला मिळविला. त्यावरुन त्यांनी मतदार यादीत आपली नावे नोंदविली. इतकेच नाही तर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी मतदानही केल्याचे सांगण्यात येते. या नागरिकांकडे पॅन कार्ड आणि आधार कार्डही आढळून आले आहे.

पुण्यातील बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांनी बेकायदा वास्तव्य केल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती.
तीन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांना बुधवार पेठेत कारवाई करुन बांगलादेशी महिलांसह साथीदारांना ताब्यात घेतले होते.
बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Related Posts