IMPIMP

Pune Crime News | ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने एकाची 15 लाखांची फसवणूक, विश्रांतवाडी परिसरातील घटना

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 15 लाख 82 हजार 975 रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Pune Police) सायबर चोरट्यांवर (Cyber Thieves) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तक्रारदार यांच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत अमरनाथ नकुलचंद्र रॉय Amarnath Nakulchandra Roy (वय-51 रा. आनंदपार्कस वैभवनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 9302263104 क्रमांकाचा मोबाईल धारक, टेलिग्राम धारक व पंजाब बँकेतील खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी मोबाईल धारकाने फिर्यादी यांना व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. फिर्यादी यांना मेसेज करुन ऑनलाईन टास्क (Online Task) पूर्ण केल्यानंतर भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. त्यानंतर टेलिग्रामवर (Telegram) एक लिंक पाठवून फिर्यादी यांना खाते उघडण्यास सांगितले. खाते उघडल्यानंतर त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करुन घेतले. ग्रुप चालवणाऱ्या सायबर चोरट्याने सुरुवातीला फिर्यादी यांनी भरलेल्या व पूर्ण केलेल्या टास्कची रक्कम तक्रारदार यांना देऊन विश्वास संपादन केला.

यानंतर सायबर चोरट्यांनी वारंवार वेगवगेळी कारणे सांगून फिर्यादी यांना बँक खात्यात 15 लाख 82 हजार 975 रुपये
भरण्यास सांगितले. यानंतर त्यांना कोणताही टास्क अथवा दिलेली रक्कम परत केली नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अमरनाथ रॉय यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे (PI Bhalchandra Dhavale) करीत आहेत.

Related Posts