IMPIMP

Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी

by nagesh
Pune Nashik High Speed Railway | pune nashik semi high speed rail line project gets nod

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Pune Nashik High Speed Railway | पुणे -नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या
प्रस्तावास आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra
Fadnavis) यांनी दिली. (Pune Nashik High Speed Railway)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फडणवीस यांनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. श्री फडणवीस म्हणाले, रेल्वे मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असून त्यासाठी मंत्र्यांचे आणि केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले. लवकरच राज्य शासनाचे संबंधित कंपनी आणि केंद्राचे अधिकारी यांच्यात बैठक घेऊन पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबतच्या तांत्रिक बाबींना मूर्त स्वरूप देण्यात येईल असेही फडणवीस यांनी सांगितले.

 

महाराष्ट्राची दोन ऐतिहासिक शहर जोडण्याने राज्याच्या विकासाला गती मिळेल – रेल्वेमंत्री

पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची शहरं आहेत.
रेल्वेच्या माध्यमातून या शहराच्या आर्थिक स्थितीला गती मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुकही त्यांनी केले.

 

Web Title :-  Pune Nashik High Speed Railway | pune nashik semi high speed rail line project gets nod

 

हे देखील वाचा :

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding | सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील संगीत पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News | बंद पडलेला व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे घेऊन एक कोटीची फसवणूक; राम निरंजन डागा, संदीप डागासह महिलेविरूध्द गुन्हा दाखल

Pune Crime News | एकट्या चोरट्याने तीन ठिकाणी हिसकाविले महिलांच्या गळ्यातील दागिने

 

Related Posts