IMPIMP

Pune NCP Protests Against Girish Bapat | पाणी प्रश्नाकडे खासदार गिरीश बापट यांचे सोयीस्करपणे दुर्लक्ष, राष्ट्रवादीचे खा. बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन

by nagesh
Pune NCP Protests Against Girish Bapat | MP Girish Bapat conveniently ignores water issue Pune NCP agitation in front Girish Bapat office

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune NCP Protests Against Girish Bapat | पुण्यातील पाणी प्रश्नावरुन (Pune Water Supply) राष्ट्रवादी
काँग्रेस (Pune NCP) चांगलीत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणेकरांना हक्काचे पाणी मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खासदार
गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या कार्यालयासमोर शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन (Agitation) केले. यावेळी बोलताना प्रशांत म्हणाले, पालिकेत गलथान कारभार सुरू असताना पुणे शहराचे भाजपचे (BJP) खासदार गिरीश बापट यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. आता प्रशासक (Administrator) आल्यानंतर मात्र झोपेतून जागे झालेल्या कुंभकर्ण प्रमाणे ते जागे झाले असून त्यांना अचानकपणे पुणेकरांच्या प्रश्नांची जाण जाणीव होऊ लागली आहे, अशी टीका जगताप यांनी केली. (Pune NCP Protests Against Girish Bapat)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रशांत जगताप पुढे म्हणाले, पुणे शहरात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षात शहरातील पाणीपुरवठ्याचे कुठल्याही प्रकारचे नियोजन (Planning) करता आले नाही. संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येणे, दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद असणे, पाणी न येणे असे प्रकार वारंवार घडत असून हे महापालिकेतील गेल्या पाच वर्षातील सत्ताधारी भाजपचे अपयश आहे. पुणेकरांच्या या मनस्तापाला केवळ भाजप जबाबदार आहे. 2017 च्या निवडणुकीपूर्वी 24×7 पाणीपुरवठा (PMC 24×7 Water Supply Project) करणार असल्याचे सांगत भाजप सत्तेत आली. आज प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की 24 तास तर सोडा हक्काचे 1 तास सुध्दा पाणी मिळत नाही. (Pune NCP Protests Against Girish Bapat)

 

 

मुळात समान पाणी वाटप योजनेचे काम तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु पाच वर्ष होऊन देखील भाजपलाही काम पूर्ण करता आले नाही.
या कामाची झळ आज समस्त पुणेकरांना बसत आहे.
पाणीपुरवठ्याचे टॅक्सचे (PMC Water Supply Tax) संपूर्ण पैसे घेऊन देखील 365 दिवस महानगरपालिका Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा करत नसेल, तर गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामावर ती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हा सर्व गलथान कारभार सुरू असताना पुणे शहराचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले.
आता प्रशासक आल्यानंतर मात्र झोपेतून जागे झालेल्या कुंभकर्ण प्रमाणे ते जागे झाले असून त्यांना अचानकपणे पुणेकरांच्या प्रश्नांची जाण जाणीव होऊ लागली आहे, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जगताप पुढे म्हणाले, पुणेकर जनता सुज्ञ असून भाजप कडून सुरू असलेली ही दिशाभूल जनतेने वेळीच ओळखावी.
प्रत्येक प्रभागात हिच परिस्थिती असून केवळ लाटेवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या कामांवर संकल्पना म्हणून बोर्ड लावण्याचे काम केले आहे याव्यतिरिक्त भाजप नगरसेवकांचे कुठल्याही प्रकारचे कर्तुत्व नाही ”
असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या या आंदोलनाच्या वेळी ‘अहो बापट, काय हे नाटक ? सत्तेचे अपयश लपवण्यासाठी कसली ही आदळआपट’ ,
‘पाणी देणार होते 24 तास, मात्र पाणी मिळेना आम्हाला धड दोन तास’, ’24×7 योजनेचे काय झाले..?’ , ‘गिरीश बापट जवाब दो’,
‘खासदार साहेब झाली का झोप…?’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
यावेळी अंकुश काकडे (Ankush Kakade), प्रवक्ते प्रदीप देशमुख (Spokesperson Pradeep Deshmukh),
रवींद्र माळवदकर, शशिकांत जगताप, आसिफ शेख, गणेश नलावडे, सचिन शेलार, वनीता जगताप, नीता गलांडे,
युसुफ शेख, संजय गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP Protests Against Girish Bapat | MP Girish Bapat conveniently ignores water issue Pune NCP agitation in front Girish Bapat office

 

हे देखील वाचा :

PAN-Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख पुढील वर्षापर्यंत वाढवली ! परंतु ‘मोफत सेवा’ आता बंद; आता लागतील ‘इतके’ पैसे

Bad Cholesterol Lowering Foods | कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश; होणार नाहीत हृदयाचे आजार

 

Related Posts