IMPIMP

Pune News | बहुसोमयाजी यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांचे पुण्यात श्रावण मास शिवपूजन अनुष्ठान

by nagesh
Pune News | Bahusomayyaji Yajneshwar Maharaj Selukars Shravan Mass Shiva Puja Ritual in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | पुणे शहरात येत्या श्रावण मासात (Shravan Month) 29 जुलै ते 28 ऑगस्ट 2022 या दरम्यान गंगाखेड येथील परमपूजनीय बहुसोमयाजी यज्ञेश्वर महाराज सेलुकर (Bahu Somayyaji Yajneshwar Maharaj Selukar) यांचे श्रावण मास शिवपूजन अनुष्ठान होणार आहे. यानिमित्ताने अनेक कार्यक्रमाचे नियोजन संपूर्ण महिनाभर करण्यात (Pune News) आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याचे वैशिष्ट्य म्हणजे परमपूज्य सेलूकर महाराजांच्या घराण्यात गेल्या चार पिढ्यापासून श्रौत अग्निहोत्र व्रत अव्याहतपणे चालू आहे. यावर्षी या व्रताला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच शिवपूजन (कोटी लिंगार्चन) व्रताला याच वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच परमपूज्य यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांचे वडील गवामन सत्र सोमयाजी श्री रंगनाथ कृष्ण सेलूकर (Ranganath Krishna Selukar) महाराज यांचेही हे जन्मशताब्दी वर्ष आहे. असा अनुपम त्रि – शताब्दी साजरा करण्याचा अभिनव सोहळा अनुभवण्याची संधी सुज्ञ पुणेकरांना मिळणार आहे. (Pune News)

 

आपल्या भारत वर्षाला शिवपूजनाची फार मोठी परंपरा आहे. पुराण काळातच नाही, तर प्राचीन भारतामध्ये मोहेंजोदडो (Mohenjo-Dado) हडप्पा संस्कृतीमध्ये (Harappan Culture) सापडलेल्या उत्खननात आपल्याला तीन मुखे आणि शिंगे असलेल्या मूर्तीवर पाच – सहा अक्षराच्या लेखाचा समाधानकारक अर्थ लागत नसला, तरीही विद्वानांच्या मते याचा अर्थ शिवपूजनाशी जोडलेला दिसतो. तसेच टेरिकोटा (कलीबंगान) येथे अनेक शिवलिंगे सापडलेले आहेत. भारताबाहेर सुद्धा अनेक ठिकाणी शिवलिंगे व मंदिरे सापडतात. एतनाम, कंबोडिया, जावा, सुमित्रा इराक, इराण इत्यादी देशात सुद्धा शिवपिंडी सापडलेले आहेत.

 

श्रावण मास शिवपूजन सोहळ्यात प्रतिदिन प्रदूषकाली वेदमंत्राच्या साह्याने अभिषेक पूजन, बिल्वार्चन, नित्य अग्निहोत्र होम,
दर्श- पौर्णिमास याग तसेच या कार्यक्रमासाठी परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज (आचार्य किशोरजी व्यास)
यांचे विशेष आशीर्वचन 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे.
तसेच पंडित प्रवर गणेश्वर शास्त्री द्रविड (काशी), भागवताचार्य अनंत शास्त्री मुळे – गोंदीकर,
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. रघुनाथ शुक्ल (ज्येष्ठ वैज्ञानिक)
डॉक्टर गो. बं. देगलूरकर, डॉ. भाग्यलता पाटसकर, डॉ. रवींद्र मुळे. आदी विद्वानांची व्याख्याने, प्रवचने महिनाभर होणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

श्रावण मास शिवपूजन शुभारंभाचा सोहळा दिनांक 29 जुलै रोजी ठीक सकाळी 11 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमासाठी काशीहून आलेले पंडित प्रवर गणेश्वर शास्त्री द्रविड,
डॉ. अभय टिळक विश्वस्त, माऊली ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी,
ह. भ. प. नितीन महाराज मोरे अध्यक्ष, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू,
विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड संस्थापक अध्यक्ष एमआयटी विश्व विद्यापीठ पुणे,
बाळासाहेब काशीद अध्यक्ष, भंडारा डोंगर ट्रस्ट देहू, राजेश धनराज राठी अध्यक्ष, माहेश्वरी चारिटेबल फाउंडेशन पुणे,
आनंद पिंपळकर (प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ), धनंजय देसाई संस्थापक अध्यक्ष, हिंदुराष्ट्र सेना, सुरेश देवराम धर्मावत (प्रसिद्ध उद्योजक) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व पुणेकर बंधू – भगिनीं या धर्मकार्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रावण मास शिवपूजन सेवा समिती 2022 पुणे तथा समस्त सेलूकर महाराज शिष्य परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

श्रावण मास शिवपूजन शुभारंभाचा सोहळा दिनांक 29 जुलै 2022 रोजी ठीक सकाळी 11 वाजता

स्थळ – महेश सांस्कृतिक भवन 12/2, बी, कोंडवा बुद्रुक, अप्पर इंदिरानगर शेवटच्या बस स्टॉप जवळ, पुणे – ४११०६२.

 

Web Title : –  Pune News | Bahusomayyaji Yajneshwar Maharaj Selukars Shravan Mass Shiva Puja Ritual in Pune

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना आमदारकी वाचवण्यासाठी 3 पर्याय, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप ?; मनसे नेत्याने सांगितले…

Monkeypox Cases Rise | मंकीपॉक्सला रोखण्यासाठी WHO चा सल्ला; म्हणाले – ‘सेक्स पार्टनर्सची संख्या कमी करा’

Mamata Banerjee | ममता बॅनर्जी अ‍ॅक्शन मोडमध्ये ! घोटाळ्यात नाव येताच पार्थ चॅटर्जींची मंत्री पदावरून हकालपट्टी

 

Related Posts